भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष आणि मुलुंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री मिहीर कोटेचा यांना वाढदिवसाच्या निमित्ताने भेटून कोळी महासंघाचे उद्योजकीय आघाडीचे प्रमुख श्री अमित जोगुरे यांनी आदिवासी कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राच्या अडीअडचणी सह ठाणे कोकण या कोस्टल एरियातील मच्छिमार कोळी समाजाच्या अडीअडचणी सह अनेक सामाजिक प्रश्नाबाबत चर्चा करून आमदार मिहिर कोटीचा यांना विनंती केली की आमचा माजी आमदार रमेशदादा पाटील यांच्या शिवाय कोणीही प्रश्न मांडत नाही ते सध्या सभागृहात नाहीत तरी आपण विधिमंडळामध्ये आदिवासी कोळी तसेच ठाणे कोकणच्या मच्छीमार बांधवांच्या बाजूने उभे राहून आमच्या समाजाच्या सामाजिक प्रश्नाला न्याय द्यावा अशी विनंती केली. तसेच त्यांना आमदार रमेशदादा पाटील यांच्या कार्यकाळातील कार्याचा अहवाल ही सादर केला. यातील अनेक कामे अर्धवट आहेत ते सोडवण्यासाठी आपण मदत करावी असे कोळी महासंघाचे वतीने निवेदन केले.
कोळी महासंघाचे उद्योग आघाडीचेप्रमुख अमित जोगुरे यांची भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कोषाध्यक्ष आमदार मिहिर कोटेचा यांना कोळी महासंघाचे वतीने प्रश्न मांडण्याची विनंती


