कोळी महासंघ – पदनियुक्ती सोहळा
कल्याण येथे कोळी महासंघ (ठाणे जिल्हा) आयोजित पदनियुक्ती सोहळा, कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व मा. आमदार रमेशदादा पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. महासंघाचे उपनेते देवानंदजी भोईर यांच्या वतीने हा पदनियुक्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. 
यावेळी, महासंघासाठी सक्रियपणे कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांची विविध महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यात आली. महासंघाची ताकद आणखी बळकट करणे, समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवणे, कोळी समाजासाठी राजकीय प्रतिनिधित्व सुनिश्चित करणे तसेच महासंघाची पुढील प्रभावी रणनीती निश्चित करणे, यांसारख्या विविध पैलूंवर सखोल चर्चा झाली. या प्रसंगी “कोळी समाजाच्या प्रगतीसाठी आपण सर्व एकजुटीने पुढे वाटचाल करूया !” हे आवाहन करण्यात आले . 
कार्यक्रमात कोळी महासंघ कार्याध्यक्ष प्रकाशजी बोबडी, चिटणीस राजहंसजी टपके, सहसचिव सतीशजी धडे, राज्य कार्यकारिणी सदस्य सुरेशजी पाटकर, युवा प्रदेशअध्यक्ष चेतनदादा पाटिल, तसेच सुभाषजी बाबडे, काशिनाथजी बामगिने, सतीशजी देशेकर, भावेशजी पाटील, सुभाषजी कोळी, रवींद्रजी भंडारी, हनुमानजी कोळी, दशरथजी पाटील, ज्ञानेश्वरजी भोईर, राजूजी कोट, भीमसेनजी पाटील आदी मान्यवरांसह इतर अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#RameshDadaPatil #KoliMahasangh #कोळीमहासंघ #ठाणेजिल्हा #पदनियुक्ती #कोळीसमाजएकजूट #नेतृत्व #समाजविकास #Maharashtra



