लातूर : नवी दिल्ली येथे सोमवार दि. 1 डिसेम्बर रोजी झालेल्या फूटवेअर डिझाईन अँड डेव्हलपमेंट इन्स्टिटयूट (fddi) च्या पदवीदान समारंभात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते कु. वैष्णवी विजयकुमार स्वामी हिला सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री पियुष गोयल आणि राज्यमंत्री जितीन प्रसाद हेही उपस्थित होते. कु. वैष्णवी स्वामी ही एफडीडीआय द्वारा संचलित देशातील एकूण १२ कॅम्पसमधून अव्वल क्रमांक पटकावत सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत शैक्षणिक केंद्र असलेल्या एफडीडीआय कॅम्पस पादत्राणे डिझाइन, फॅशन डिझाइन आणि रिटेलमध्ये विविध कार्यक्रम राबवले जातात.या यशाबद्दल कु.वैष्णवी विजयकुमार स्वामी हिचे खुप खपु अभिनंदन.


