Headlines

कोळी महासंघाच्या राज्यस्तरीय प्रमुख पदाधिकारी यांची विशेष बैठक मुख्यालयाच्या परिसरात संपन्न झाली…विविध विषयावर सखोल चर्चा

नवी मुंबई : कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोळी महासंघाच्या राज्यस्तरीय प्रमुख पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली…

या बैठकीत अनेक संघटनात्मक बाबीं वर सखोल चर्चा करण्यात आली . या बैठकीस प्रकाश बोबडी, ॲड चेतन पाटील, विशाल पाटील, प्रा.सुरेश पाटकर, सतीश धडे, शिवशंकर फुले, देवानंद भोईर युवराज सैदाने बाळासाहेब सैंदाने,मुकेश सोनवणे, हरिलाल कोळी ,चंद्रकांत घोडके,धनंजय मेहेर, शंकर मनालकर ,पहाडसिंग सुरडकर कुमार कोळी भालचंद्र वरसोलकर आदी राज्य कार्यकारींतील फक्त २५ निमंत्रित सदस्य होते…

संघटनेच्या सर्वंकष बाबींवर तसेच रक्तनात्यातील जी आर आणिजुन्या नोंदी कोळी यां नोंदीला ग्राह्य धरून कोर्टाने बरीच प्रकरणात वैदता दिली आहे त्यावर शासनाने कमिटी नेमावी अशी मागणी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयावरील पाठपुरावा या बाबत ही मा. आमदार रमेश दादा पाटिल आणि ॲड.चेतन पाटील यांनी विवेचन केले. या बैठकीत सगळेच दिग्गज पदाधिकारी असल्याने सगळ्यांनी च आपली मते व्यक्त केली…

शेवटी विशाल पाटील यांनी आभार मानताना संघटनात्मक व्यवस्थापन आणि अनुशासन यावर भूमिका मांडून मी सुद्धा हे करण्यासाठी माझ्या व्यवसायाकडे लक्ष देऊन जमेल तेवढे सहकार्य करीन असे आश्र्वासित केले…

#सतिष_धडे

#कोळी_महासंघ

#विशेष बैठक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *