Headlines

नवीन नाशिक (सिडको) येथून प्रभाग क्रमांक 27 (अनुसूचित जमाती) मधून कोळी महासंघाचे नाशिक शहर अध्यक्ष युवराज सैदाने हे भाजपा चे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्यास ईच्छुक..

आदिवासी कोळी जमात बहुउद्देशीय डेव्हलेपमेंड फाउंडेशनचे संस्थापक तथा कोळी महासंघाचे नाशिक शहराध्यक्ष मा.श्री. युवराज चिंतामण सैंदाणे हे नवीन नाशिक (सिडको) येथून प्रभाग क्रमांक 27 (अनुसूचित जमाती) मधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत नविन नाशिक (सिडको) विभागातील प्रभाग क्रमांक 27 (अनुसूचित जमाती) मधून सामाजिक कार्यकर्ते *श्री युवराज चिंतामण सैंदाणे* हे इच्छुक आहेत. त्यांनी सामाजिक कार्यासाठी एक संस्था *आदिवासी कोळी जमात बहुउद्देशीय डेव्हलेपमेंड फाउंडेशन नाशिक* या नावाने स्थापन करून समाजाची सेवा करण्यात सुरुवात केली. समाजाची सेवा करत असतांना कोळी समाजाची शिखर संस्था असलेली *कोळी महासंघ* या संस्थेच्या नाशिक शहर *अध्यक्षपदी* कार्यरत आहेत. *भाजपाचे अनुसूचित जनजाती मोर्चा नवीन नाशिक* मंडळाचे *अध्यक्ष* आहेत. *महाराष्ट्र आदिवासी कोळी जमात एकता मंच नाशिक* या संस्थेचे *कार्याध्यक्ष* म्हणून काम पाहत

आहेत तसेच रिक्षा चालक आणि मालक यांची महाराष्ट्र राज्यव्यापी *बघतोय रिक्षावाला फोरम* या संघटनेचे *नाशिक जिल्हा समन्वयक* म्हणून कार्यरत आहेत.

नाशिक शहरात सामाजिक कार्यात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. नाशिक शहरात दुःख आणि सुखाचे प्रसंग आले की त्या प्रसंगी स्वतः जातीने हजर राहून ते निस्वार्थी भावनेतूनच सेवा करण्यासाठी तत्पर हजर राहतात. प्रत्येक क्षेत्रात काम करणारा सुसंस्कृत कार्यकर्ता म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते.

या सामाजिक कार्यामुळेच त्यांना शहादा अवंतिका फाउंडेशनच्या वतीने सामाजिक कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल *बाबा आमटे पुरस्कार 2019* हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच अन्याय अत्याचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या कडून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय *समाज सेवा पुरस्कार 2019* हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याच बरोबर *कोरोना 19* या आजाराने जगभरात थैमान घातले असतांना *युवराज चिंतामण सैंदाणे* यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून *बघतोय रिक्षावाला फोरमच्या* माध्यमातून रिक्षावाल्यांच्या कुटुंबांना अन्नधान्याच्या किट देऊन त्यांना सामाजिक बांधीलकी जपली तसेच जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते त्यांना स्वतःच्या रिक्षातून दवाखान्यात ने – आण करण्यासाठी जिवाची पर्वा न करता स्वतः रुग्णाच्या मदतीला धावून जायचे तर त्यांची दखल *आपला महाराष्ट्र न्युज पोर्टल* यांच्याकडून त्यांच्या कार्याची दखल घेऊन *कोविळ योद्धा सन्मान पत्र* देऊन गौरविण्यात आले. सामाजिक कार्य आपल्या क्षेत्रात योग्य भूमिका बजावून यशस्वीपणे आपले कर्तृत्व समाजाला दाखवून दिले, आपले योगदान समस्त महिलांसाठी एक प्रेरणा निर्माण करणारे आहे म्हणून धुळे येथील वीरांगना झलकारी बाई कोळी स्री शक्ती सामाजिक संस्था यांच्या वतीने *समाज रत्न पुरस्कार 2022* हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. तसेच महा एनजीओ फेडरेशन पुणे, सप्तश्रुंगी बहुउद्देशीय महीला संस्था धुळे आणि जोशोबा सांस्कृतिक क्रीडा मंडळ सोनगीर द्वारा समाजात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सामाजिक स्वयंसेवी संस्थेच्या उज्ज्वल कार्याचा सन्मान म्हणून *कोळी महासंघनाशिक शहर* या संघटनेचे नाशिक शहराध्यक्ष म्हणून *अतुल्य सेवा सन्मान 2024* करण्यात आला. नाशिक येथील महाराष्ट्र आदिवासी कोळी जमात एकता मंच नाशिक यांच्याकडून राज्यस्तरिय पुरस्कार *कोळी समाज गौरव 2024* हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आणि एस पी एन न्यूज आणि आवाज नाशिकचा यांच्या कडून समाजाप्रती केलेल्या उल्लेखनीय व अनमोल कार्याबद्दल *लोककल्याण पुरस्कार 2025* या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

काम करत असताना त्यांनी कधीही डोळ्यासमोर राजकारण ठेवले नाही. “युवराज चिंतामण सैंदाणे” यांना मानणारा आणि चाहणारा एक मोठा गट आहे आणि या गटानेच यांना निवडणूकीत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. युवराज सैंदाणे यांचे प्रत्येक पक्षातील व्यक्तिशी आपुलकीचे आणि मधुर संबंध झाले आहेत. या संदर्भात त्यांचे मनोगत जाणून घेतले असता त्यांनी सांगितले की माझा तसा राजकारण पिंड नाही परंतु मला लहानपणापासूनच समाज कार्याची आवड आहे. प्रभागातील वार्डाच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नागरिकांना चांगल्या प्रकारे नागरी सुविधा उपलब्ध करण्यासाठी माझे प्राधान्य राहील. वार्डाचे सुशोभीकरण करून आपला वॉर्ड आणि प्रभाग आपल्या नाशिक महानगरात आगळा-वेगळा करून दाखवणार आहेत. केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कृतीवर माझा भर राहील. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा माझा पॅटर्न तयार असणार आहे. समाजाबरोबर इतर समाजाचा देखील मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. सामाजिक सेवा करण्याची तीव्र इच्छा असल्याने ते सतत समाजकार्यात सक्रिय झालेले आहेत व आता राजकारणात सक्रिय सहभागी होणार आहेत.

“युवराज चिंतामण सैंदाणे” यांचे एक तत्व आहे, ते म्हणतात की मी *कुणाशीच स्पर्धा* करत नाही. *ना कुणाचा द्वेष ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा!* आहे.

मी कधीही कोणाला लेखत नाही, मी स्वतःच माझ्या कामगिरीची तुलना करण्यासाठीच माझे प्रयत्न सुरू राहणार आहेत. यात मी नक्कीच यशस्वी होईल असे मला वाटते. “युवराज सैंदाणे यांचा विकास कामाचा संघर्ष-उद्याचे सामर्थ्य” निर्माण करणारा ठरेल यात तिळमात्र शंका नाही. एकदा जी गोष्ट करायची ठरवली की, मागे वळून पहायचे नाही हा त्यांचा ‘व्यक्तिमत्त्वाचा’ खास पैलू आहे. ज्या समाजाने आपल्याला भरभरून दिले आहे त्या समाजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. ते नेहमीच म्हणतात “कोणी चांगले म्हणावे म्हणून मी काम करत नाही परंतु ज्या कामाने अनेकांचे भले होणार असेल तर मी ते काम सोडणार नाही”. अशीच माझी भूमिका राहील आणि कायम हीच भूमिका राहील.

सर्व सामान्यांशी असलेली बांधीलकी, तरुण वर्गाची जवळीक, सामाजिक समतेचा वारसा, बदलत्या परिस्थितीत सामोरे जाण्याची आणि होत असलेले बदल आत्मसात करण्याची तयारी, संयमीपणा आणि व्यापक जनाधार” यामुळे मी येत्या 2025 – 26 च्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत नवीन नाशिक (सिडको) विभागातून प्रभाग क्रमांक 27 येथून निवडणूक लढविणार असून प्रभागाच्या आणि शहराच्या कल्याणासाठी माझी उमेदवारी राहणार आहे, असे त्यांनी शेवटी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *