🟧जळगाव तालुक्यातील मौजे चिंचोली येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव
दिनांक: मंगळवार, ०७ ऑक्टोबर २०२५- जळगाव तालुक्यातील मौजे चिंचोली येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती आज मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी कोळी महासंघ युवा प्रदेशाध्यक्ष श्री. चेतनदादा पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. श्री. चेतनदादा पाटील यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी कोळी महासंघ उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष श्री. मुकेश भाऊ सोनवणे, सल्लागार महाराष्ट्र राज्य बाळासाहेब सैंदाणे आणि संपर्कप्रमुख सुभाष सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. याव्यतिरिक्त, व्ही.टी. नाना सोनवणे, खेमराज सपकाळे, कोळी महासंघ तालुका उपाध्यक्ष जगदीश कोळी, जळगाव ग्रामीण कर्मचारी अध्यक्ष दत्तू कोळी, कोळी महासंघ तालुका जळगाव संघटक अरुण कोळी यांच्यासह काशिनाथ कोळी, आप्पा कोळी, मनोज कोळी, कांचन कोळी, रितेश कोळी, भैया कोळी, भूषण कोळी, अतुल कोळी, अनिकेत कोळी, भावेश कोळी, प्रेम कोळी, विजय कोळी , अनेक ग्रामस्थ आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. चेतनदादा पाटील यांच्या उपस्थितीमुळे चिंचोली येथील समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते .

#ChetandadaPatil #ValmikiJayanti #Chincholi #Jalgaon #KoliMahasangh #CommunityCelebration


