निलंगा तालुक्यातील आदिवासी कोळी समाज संघटनेचे आज सातव्या दिवशी ही आंदोलन सुरूच आहे. काल हॉस्पिटल मध्ये गेलेले दोन उपोषकर्तेही आज उपोषणात सामील झाले आज मराठवाड्यातील आदिवासी कोळी समाजाच्या इतर संघटनेचे पदाधिकारी ही या न्याय

मागणीसाठी सुरु अससलेल्या आंदोलन पाठिंबा देण्यासाठी आले होते. आदिम विकास परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष रमेश पिठ्ठलवाड , कोळी महासंघाचे चंद्रकांत घोडके, शिवशंकर फुले महर्षी वाल्मिकी संघटनेचे विष्णू कोळी तसेच उबाठा राजकीय पक्षाचे स्थानिक नेते तालुका प्रमुख अविनाश रेशमें उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे यांनीही आंदोलनास पाठिंबा दिला. तालुक्यातील आदिवासी कोळी समाजाच्या महिला पुरुष बहुसख्येने आंदोलन स्थळी उपस्थित होते. दुपारी ३ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी श्री शरद झाडके यांच्या दालनात बाहेरून आलेले सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक सकल आदिवासी कोळी महादेव , मल्हार कोळी समाज संघटनेचे सुकाणू समितीचे

सदस्य यांच्यात झालेल्या बैठकीत काही मुद्द्यावर एकमत झाले आहे. काही बाबतीत तहसील स्तर आणि सेतू स्तरावर सूचना द्यायची मागणी ही त्यांनी मान्य केली. उद्या प्रलंबित प्रस्तावावर काय होते हे पाहून संघटना अन्नत्याग आंदोलन जारी ठेवायचे की स्थगित करायचे याचा निर्णय घेईल असे माननीय उपविभागीय अधिकारी श्री शरद झाडके यांना सांगून आज शिष्टमंडळाने अन्न त्याग आंदोलन सुरू ठेवले आहे..



