Headlines

कोळी समाजाने केले  युतीच्या बाजूने मतांचे ध्रुवीकरण भाजप महायुतीच्या  महाविजयात कोळी महासंघाचा खारीचा नव्हे सिंहाचा वाटा….

महाराष्ट्रात कोळी समाज बहुल असलेले विधानसभेचे ९७ मतदार संघ आहेत ज्यामध्ये ६५ मतदार संघात कोळी समाजाचे मतदान निर्णायक आहेत. या मतदारसंघात कोळी महासंघानं निवडणुकीच्या दरम्यान प्रचंड यंत्रणा राबविली. कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या उमेदवारांना या मतदार संघातून मतदान घडविण्यात आले. त्यामुळे महायुतीचे सर्व उमेदवार या मतदारसंघातून निवडून आले.
राज्यातील कोळी समाज विखुरलेला होता पण 2011 पासून रमेश दादा पाटील यांच्या नेतृत्वाने राज्यातील सर्व संघटनांची शिखर संस्था म्हणून कोळी महासंघ उदयास आणली 2014 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देता की जाता हा नारा देऊन दुर्लक्षित असलेल्या कोळी समाजाने राजकीय लक्ष वेधले. तत्कालीन काँग्रेस आघाडीचे सरकार पाडण्यामागे भाजप आणि शिवसेना युतीला आपण मतदान केले होते त्या पार्श्वभूमीवर कोळी समाजाच्या बऱ्याच प्रश्नांना गती मिळाली सुटण्याच्या अंतिम टप्प्यावर आलेले आहेत या कोळी समाजाच्या एकजुटीच्या मतदानाने हा परिणाम झाला होता.
काही प्रश्न प्रलंबित असताना लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्याची विशेष बैठक घेऊन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कोळी समाज मतदानाची जाणीव करून दिली ज्याद्वारे त्यांनी ती मान्यही केली. कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्रासह किनाऱ्याच्या मच्छीमारी, मुंबई आणि ठाणे येथील मूळ भूमिपुत्र असलेल्या कोळी समाजाच्या कोळीवाड्यांचा गावठाणातील प्रश्न आणि जमीन या संदर्भातील प्रश्नाची दखल घेऊ या ठोस आश्वासनानंतर लोकसभेला पाठिंबा दिला.
पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि मित्र पक्षांनी समाजाला न दिलेल्या उमेदवारी आणि प्रलंबित राहिलेल्या जातीचा प्रश्न घेऊन 30 ऑक्टोबर 2024 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत थेट चर्चा केली. कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्यासह कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी सरचिटणीस राजहंस टपके, सहसचिव सतीश धडे, कोकण विभाग प्रमुख प्रा अभय पाटील, डॉ. चारुल भानजी या वरिष्ठ पदाधिकार्यांनी सागर बंगल्यावर त्यांना लोकसभा निवडणुकी नंतर समाजाला दिलेल्या अनेक आश्वासनापैकी पुरेसे आश्वासने अपूर्ण असल्याची जाणीव करून दिली ज्यामुळे आदिवासी कोळी समाज तसेच मच्छीमार बांधव नाराज आहे. समाजाच्या निरनिराळ्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या.
यावर विधानसभा निवडणुकीमध्ये आपण ठोस निर्णय घेण्याचे व सर्व प्रश्न सकारात्मकतेने सोडविणार असल्याची खात्री करून दिली.
या पार्श्वभूमीवर मां.देवेंद्र फडणवीसां सोबत झालेल्या शिष्टाचाराने 31 ऑक्टोबर रोजी कोळी महासंघाच्या मुख्य कार्यालयात पुनश्च एकदा राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला कोळी महासंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय केला.
महाराष्ट्रातील 288 मतदार संघापैकी कोळी महसंघाच्या सर्वे नुसार 97 मतदार संघामध्ये कोळी समाज हा बहुसंख्येने राहतो त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन कॉर्नर बैठका मेळावे किंवा जमेल त्या प्रकारे एकत्र येऊन भारतीय जनता पार्टी महायुतीचा प्रचार सक्रियपणे करायचा याचे नियोजन कोळी महासंघाचे युवा नेते ॲड .चेतन पाटील आणि सरचिटणीस राजहंस टपके यांनी केले. तशा प्रकारच्या सूचना प्रत्येक जिल्हाध्यक्षांना देण्यात आल्या.
खानदेश उत्तर महाराष्ट्र मुंबई कोकण या विभागातील मतदार संघात माजी आमदार रमेशदादा पाटील यांनी प्रकाश बोबडी, राजहंस टपके, हेमंत कोळी, प्रमोद वैद्य, सुनिता माहुलकर, मुकेश सोनवणे, हिरालाल कोळी, गुलाबराव गांगुर्डे ,विशाल मळेकर, युवराज सैदाने या पदाधिकाऱ्यांसह अनेक मतदारसंघांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठका प्रत्येक सुभेदाराच्या गाठीभेटी आणि गावोगाव जिथे लोकसंख्या जास्त आहे त्या ठिकाणी कॉर्नर बैठका घेऊन भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना युतीच्या समर्थनार्थ प्रचार कार्य केले.
मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रामध्ये कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश दादा पाटील यांच्या आदेशानुसार युवानेते ॲड .चेतन पाटील यांनी भाजपा महायुतीच्या प्रचार केला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांच्या सोबत विकास सूर्यवंशी ,बाळासाहेब माने, पोपट पुजारी, कुमार कोळी ,बाळासाहेब शिरगुडे ,अरुण लोणारी, सुरेश प्याटी, विक्रम शिरसट ,प्रकाश कोळी ,कुमार कोळी, रुकमिनिताई अंबिगर, तुषार शिंदे ,अनिल केळंगने ,दत्ता माडीबोने, डीएम कोळी ,किसन खामकर या पदाधिकाऱ्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांमध्ये सक्रिय प्रचार कार्य केले.
सोलापूर वरून मराठवाड्यामध्ये येताना कोळी महासंघाचे उपाध्यक्ष शिवशंकर फुले ,सहसचिव सतीश धडे, ॲक्शन कमिटीचे प्रमुख चंद्रकांत घोडके ,गोविंद सोदले ,मनोज भाले, महादेव सलके , पंडित फुलसुरे ,माणिक घंटे ,विष्णू कोळी, इंद्रजीत यादगिरे ,महादेव कंडूकटले ,गोरख पुरने, शंकरराव मनाळकर ,राम मालेवाड ,नागनाथ लोखंडे, सचिन शिरंगवाड, रामू मोते ,सूर्यकांत सूर्यवाड सर,सुनील मुदीराज ,गणेश मोरे, विलास बेदरे, रमेश सर्जे यांच्यासह तुळजापूर उमरगा निलंगा औसा लातूर उदगीर मुखेड नायगाव कंधार नांदेड सिल्लोड भोकरदन हिंगोली कळमनुरी वाशिम या मतदारसंघांमध्ये पदाधिकाऱ्यांसह बैठका घेऊन अधिकृत उमेदवाराच्या ही प्रचार कार्यालयात जाऊन पाठिंबा देण्यात आला. प्रवासादरम्यान ज्या ठिकाणी कोळी समाज बहुसंख्येने आहे त्या ठिकाणी त्या त्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यासह बैठक घेऊन भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना विजय करण्या बाबतचे आदेश करण्यात आले.
त्यानंतर विदर्भाचे अध्यक्ष पहाडसिंग सुरडकर यांच्यासह विदर्भातील चिखली मलकापूर बुलढाणा या मतदारसंघांमध्ये युवा नेते अडवोकेट चेतन पाटील यांनी प्रचार कार्यात सक्रिय सहभाग घेतला. वेळेअभावी विदर्भातील अनेक ठिकाणी फक्त कॉर्नर बैठका घेऊन पदाधिकाऱ्यांना सुचित करून भाजपा महायुतीसाठी प्रचार कार्य करण्यात आले.
हे कार्य करत असताना कोळी महासंघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना महाआघाडीच्या स्थानिक अधिकृत उमेदवारांनी आश्वासन आणि आमिष देऊन फोडले किंवा ज्यांनी भाजपाने लोकसभेमध्ये दिलेली आश्वासन पूर्ण केले नाही म्हणून बंडखोरी केली अशा पदाधिकाऱ्यांना कोळी महासंघाने ताबडतोब पदावरून बडतर्फ करून त्या ठिकाणी दुसऱ्या पदाधिकाऱ्याला प्रभारी नेमून महायुतीच्या अधिकृत उमेदवार साठी प्रचार कार्य करण्याच्या सूचना केल्या… असे नियोजनबद्ध केल्याने मराठा सह ओबीसी नाराज असताना सुद्धा रमेश दादा पाटील यांच्या प्रेमाखात कोळी समाज प्रचाराच्या मैदानात उतरला. त्यांच्यावरील विश्वासाने तमाम महाराष्ट्रातील कोळी समाज संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या साठी तन-मन-धनाने त्या पक्षासोबत त्याचबरोबर स्वतंत्रपणे प्रचार यंत्रणा राबविली. परिश्रम आणि नीटनेटके नियोजन या रमेश दादा पाटलांच्या नेतृत्वाने 65 मतदार संघात भाजपा आणि सोबत असणाऱ्या शिवसेना राष्ट्रवादी या महायुतीला कोळी समाजाचे निर्णायक मतदान त्यांच्या पारड्यात टाकले.
राज्याच्या या निवडणुकीत प्रथमच असे घवघवीत यश एका पार्टीला मिळालेलं आपण पाहिले आहे. या यशामागे कोळी समाजाने आणि कोळी समाज संघटनांची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघाने भरीव आणि पारदर्शकपणे कार्य केले आहे.
जिथे महायुती आणि महाआघाडी च्या दरम्यान काटेकी टक्कर होईल अशी भाकिते सतत केली जात होती. भाजप मित्र पक्षांना देखील एकतर्फी विजयाची किंचितही आशा नव्हती,कारण मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण धनगर आरक्षण आणि संविधान  विरोधी पार्टी अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न तथकाठीत बुध्दी वादी आणि पेड सोशल मीडिया आर्मी ने केलेली असताना ही अशा परिस्थितीत कोळी महासंघाने दिलेले हे योगदान म्हणजेच भाजप आणि महायुतीच्या महाविजयात रमेश दादा पाटील यांच्या नेतृत्वात कोळी महासंघाचा खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
…. सतीश धडे संपादक कोळी समाज संदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *