दिनांक 01 (जिमाका) : रब्बी हंगाम एक डिसेंबर 2024 पासून राज्यात सुरू होत आहे. शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्यासाठी आधी ई-पीक पाहणी मोबाईल ॲप उपलब्ध होते. परंतु आता केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे काही तांत्रिक दुरूस्ती करून नवीन रूपात ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या नंतर 100 टक्के पीक पाहणी सुधारित ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲपद्वारे संपूर्ण राज्यात होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपली पीक पाहणी ठराविक मुदतीत करून घ्यावी. जेणेकरून कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचण येणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
शेतकरी स्वत: पिकांची नोंद ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदवायचे व उर्वरीत पीक पाहणी जे शेतकऱ्यांनी नोंदवलेली नाही, ते तलाठी यांच्यामार्फत होत असत. त्यामध्ये दुरूस्ती करून शेतकऱ्यांना हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक नोंदणी होणार आहे. पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती, एमएसपी अंतर्गत पिकांची नोंद इत्यादी सुविधांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲपमध्ये पिकांची नोंद असणे आवश्यक आहे.
*नवीन मोबाईल ॲपमधील आवश्यकता*
• पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून 50 मीटरच्या आत फोटो घेणे अनिवार्य आहे.
• पिकांचे दोन फोटो घेणे बंधनकारक.


