भाजपाचे जेष्ठ नेते, माजी आदिवासी विकास मंत्री ,आदिवासी कोळी महादेव समाजाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन झाले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ब्रेन स्ट्रोक आल्याने दोन महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
त्यांचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर भाजप असा राजकीय प्रवास राहिला आहे.
मधुकर काशिनाथ पिचड: (१ जून, १९४१ – ६ डिसेंबर, २०२४)पिचड यांचा जन्म १ जून १९४१ रोजी राजूर, अहमदनगर जिल्ह्यात महादेव कोळी या आदिवासी कुटुंबात झाला. त्यांचे वडील काशिनाथ पिचड हे शिक्षक, तर आई कमलबाई ह्या घरगृहिणी होत्या.फर्ग्युसन कॉलेज पुणे येथून त्यांनी बीए एलएलबी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. इथेचत्यांनी विद्यार्थी दशेत राजकारणात प्रवेश केला.१९७२ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यापासून पिचड यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तसेच १९७२ मध्ये पंचायत समिती अकोले तालुका अध्यक्ष म्हणून निवडून येऊन १९८० पर्यंत काम केले.मधुकर पिचड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून केली. त्यानंतर ते १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे संस्थापक सदस्य होते. २०१९ मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा वैभव पिचड यांच्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तत्पूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्राचे अध्यक्षपद देखील भूषवले होते.पिचड यांनी १९६१ मध्ये अमृतसागर सहकारी दूध संघ, अकोलेची स्थापना केली होती.ते अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष होते.राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र सरकार मधील कॅबिनेट मंत्री होते. त्यांनी १९८० ते २००९ पर्यंत अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले आहे. मार्च १९९५ ते जुलै १९९९ पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते.
आदिवासी कोळी महादेव समाजाचे जेष्ठ नेते मधुकर राव पिचड यांचे निधन वयाच्या ८४ वर्षी ६ डिसेंबर २०२४ रोजी घेतला अखेरचा श्वास त्यांना कोळी समाज संदेश परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली.. सतीश धडे



