Headlines

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची यशस्वी चाचणी!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची यशस्वी चाचणी!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायुदलाच्या वतीने ‘सी-295’ विमानाचे यशस्वी लँडिंग आणि ‘सुखोई-30’ च्या फ्लाय पासने धावपट्टीची चाचणी घेण्यात आली. ‘सी-295’ विमानाच्या यशस्वी उतरणीनंतर विमानाला वॉटर सॅल्यूट देण्यात आला, ज्यामुळे या ऐतिहासिक क्षणाची महत्ता अधोरेखित झाली. त्याचबरोबर ‘सुखोई-३०’ विमानाचा देखील यशस्वीपणे फ्लाय पास करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित होतो .

 

भारतीय वायुदल, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, आणि या ऐतिहासिक चाचणीचे साक्षीदार झालेले अनेक मान्यवरांनी या यशाचा आनंद साजरा केला. नवी मुंबई विमानतळाच्या विकासाचे प्रतीक असलेल्या या क्षणाने महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाकांक्षी प्रकल्पांना एक नवी दिशा मिळणार आहे.

या चाचणीवेळी राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ जी , सिडको महामंडळाचे अध्यक्ष श्री. संजय शिरसाट जी, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे जी, खासदार श्री. श्रीरंग बारणे जी, खासदार श्री. सुनील तटकरे जी, खासदार श्री. नरेश म्हस्के जी, आमदार श्री. गणेश नाईक नाईक, आमदार श्री. प्रशांत ठाकूर जी, आमदार श्री. महेश बालदी जी, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *