कोळी महासंघाचे अध्यक्ष माजी.आमदार श्री.रमेशदादा पाटील यांना कॉमन वेल्थ पार्लीमेंट्री असोशियेषन महाराष्ट्र शाखेच्या वतीने उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार आज विधान भवन मुंबई येथे राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मु यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यपाल महोदय ही उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने घोषित महाराष्ट्र विधान परिषदेतील उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले .
आदिवासी कोळी समाज आणि मासेमारी करणाऱ्या कोळी समाजाच्या तसेच आगरी वैती कोळी डोंगर कोळी यांच्या ज्वलंत प्रश्नांवर सातत्याने उठविलेला आवाज आणि प्रकट केलेले वास्तव याचा विचार करून श्री .रमेशदादा पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
कोळी महासंघाच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांच्या वतीने श्री .रमेशदादा पाटील साहेब यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
कोळी समाज संदेश परिवाराच्या वतीने ही त्यांचे मनापासून आभार.
संपादक – सतीश धडे..
उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले; वर्षनिहाय पुरस्कार विजेत्या सदस्यांची नावे पुढील प्रमाणे –
सन २०१८-१९ विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य सर्वश्री बाळासाहेब थोरात, डॉ. संजय कुटे उत्कृष्ट भाषण पुरस्कार – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानसभा सदस्य पराग अळवणी.
विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सदस्य निरंजन डावखरे. उत्कृष्ट भाषण पुरस्कार – हुस्नबानू खलिफे, सुजितसिंह ठाकूर.
सन २०१९-२० विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य प्रकाश आबिटकर, आशिष शेलार.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार – सदस्य सुनील प्रभू, दिलीप मोहिते-पाटील.
विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सतीश चव्हाण, अनंत गाडगीळ.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार – रामहरी रूपनवार, श्रीकांत देशपांडे.
सन २०२०-२१ विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – अमित साटम, आशिष जयस्वाल.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार – प्रताप सरनाईक, प्रकाश सोळंके.
विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य प्रवीण दरेकर, दिवंगत सदस्य विनायक मेटे.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार सदस्य – मनीषा कायंदे, बाळाराम पाटील.
२०२१-२२ विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य संजय शिरसाट, प्रशांत बंब.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार – सदस्य सरोज अहिरे, सिद्धार्थ शिरोळे.
विधन परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य अनिकेत तटकरे, सदाभाऊ खोत,
उत्कृष्ट भाषण पुरस्कार – गोपीकिशन बाजोरिया, विक्रम काळे
सन २०२२-२३ विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य भरत गोगावले, चेतन तुपे, समीर कुणावार. उत्कृष्ट भाषण पुरस्कार – सदस्य यामिनी जाधव, अभिमन्यू पवार.
विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य प्रसाद लाड, महादेव जानकर.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार -सदस्य बाबाजानी दुर्राणी, प्रज्ञा सातव.
सन २०२३-२४ विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य रमेश बोरनारे, अमिन पटेल, राम सातपुते.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार – सदस्य कुणाल पाटील, श्वेता महाले, प्राजक्त तनपुरे.
विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रमेशदादा पाटील.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार – आमशा पाडवी, श्रीकांत भारतीय, सुनील शिंदे यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.(माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय मुंबई )


