Headlines

निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु) ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश

 *गणेश आप्पा बिरादार यांची अंबुलगा जिल्हा परिषद गटाच्या विभाग प्रमुख पदी निवड* 

निलंगा:- तालुक्यातील मौजे अंबुलगा जिल्हा परिषद गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सदस्य नोंदणीच्या कार्यक्रमानिमित्त अंबुलगा येथे “निलंगा तालुकयात जेव्हा जेव्हा परिवर्तनाची क्रांती झाली आहे तेव्हा तेव्हा अंबुलगा गावाने मोठे योगदान दिले आहे” असेच वातावरण यावेळी निर्माण झाले आहे,असे मत शिवसेनेच्या नेत्या डॉ. शोभाताई बेंजर्गे यांनी यावेळी बोलताना सांगीतले.

यावेळी शिवसेनेचे लातुर उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे, तालुका प्रमुख अविनाशदादा रेश्मे, तालुका समन्वयक शिवाजी पांढरे, युवासेना तालुकाप्रमुख, प्रशांत वांजरवाडे,उपतालुका प्रमुख प्रदिप पाटील मनोज तांबाळे किशोर मोरे खंडू काकडे उपस्थित होते या कार्यक्रमात शेकडो युवकानी शिव सेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून अंबुलगा गावचे ग्रामपंचायत सदस्य गणेश आप्पा बिरादार यांच्या समवेत ज्ञानेश्वर शिंदे,अझहर शेख, वैभव देशमुख , राम जाधव विद्यासागर शिंदे,अनिल खुदनपुरे,विशाल मिरकले, शेकडो युवकांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक बालाजी सगर भास्कर देशमुख दास हुलगुत्ते अमोल शिंदे नरहरी शिंदे खंडू काकडे प्रसाद पेदे खादर शेख ून सूर्यवंशी धनाजी काकणे यशवंत बिरादार चंद्रकांत बिरादार तुकाराम कांबळे रमेश पात्रे बालाजी हुलगुत्ते निखिल मिरकले सुनील जाधव जयदीप पाटील अनिल जाधव फिरोज मुल्ला सिद्धेश्वर खुदनपुरे युवराज कांबळे विशाल पात्रे चंद्रकांत काकणे तसेच महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष श्री नानासाहेब काकडे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *