निलंगा, ता. ३० : निझाम कालीन नोंदी नुसार मराठवाड्यातील कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी टोकरे यासह तत्सम जमातीवर आरक्षण सवलती बाबत मोठा आन्याय होतोय याची जाणीव मला आहे अशी खंत वंचित बहूजण विकास आघाडीचे सर्वेसर्वा अॕड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी ता. २९ रोजी व्यक्त केली.
लातूर जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव समाजाच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले त्या निवेदनात असे नमुद केले आहे की, मराठवाडा व राज्यातील आदिवासी कोळी समाजाच्या बाधवाना जातप्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नाही अनुसूचीत जाती व इतर मागासवर्गीय जाती प्रमाणे अनुसूचीत जमातीसाठीही रक्त नात्यातील वैधता देण्यात यावी राज्यातील एस.सी. व इतर मागासवर्गीयांना रक्त नात्यात जात पडताळणी झाली असेल तर (म्हणजे वडील, काका, आजोबा, चुलत चुलते, आत्या) त्यांच्या पाल्यांनाही त्वरीत वैधता प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय आहे. परंतु एकमेव अनुसूचीत जमाती (एस.टी.) ची जातपडताळणी आहे त्याना रक्त नात्याचा निर्णय लागू नाही हा मोठा भेदभाव आहे. मराठवाड्यातील महादेव कोळी समाज मोठ्या प्रमाणात आहे. छत्रपती संभाजीनगर व किनवट समितीकडून मोठा अन्याय सुरू आहे. रक्त नात्यात वैधता प्रमाणपत्र असतानाही वैधता दिली जात नाही लाभार्थ्यांना अनेकवेळा चौकशीला सामोरे जावे लागते त्यांचा वेळ, मानसिक त्रास पडताळणी समितीचा सहन करावा लागतो, रक्त नात्याची वैधता देणे तर दुरच उलट नोटीसा पाठवून छळवणूक केली जाते. याबाबत शासनाने ठोस निर्णय घेण्याची
गरज आहे. अनेकवेळा या समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जातात. (आदिवासी २५ आमदार विरोध करतात) विधानसभा मतदार संघ अनेक वर्षापासून तेच आरक्षित आहेत. एस.टी. मतदार संघासाठी राज्यातील लोकसंख्या गृहीत धरली जाते लाभ मात्र ठराविक लोकांना/समाजाला मिळतो हे दुर्दैव आहे. मराठवाड्यासह विस्तरित क्षेत्रातील आदिवासी कोळी महादेव मल्हार कोळी आणि टोकरे कोळी आदी जमातीच्या आरक्षणाच्या प्रशांवर शासनास आपल्या पक्षा मार्फत जाब विचारून आमच्यावरील होणार हा अन्याय दूर करण्यास मदत करावी असे निवेदन त्यांना आले. यावेळी त्यांनी शिष्ट मंडळाला उत्तर देतांना म्हणाले की, या समाजावर मोठा अन्याय होत आहे ठराविक जातीचेच लोकांना फायदा होत असून राजकीय आरक्षणासाठी मात्र राज्यातील संपूर्ण जनगणनेचा आधार घेतला जातो. सवलती मात्र दिल्या जात नाहीत याबाबत शासनाने विचार करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कोळी महासंघाचे राज्य सचिव सतीश धडे, जिल्हाध्यक्ष पंडीत फुलसूरे, अमोल सारगे , संजय राजरुळे प्रशांत नलमले, बालाजी अवले, नागेश आवले यासह कोळी महासंघाचे शिस्टमंडळ होते. 
निजाम कालीन नोंदी नुसार मराठवाड्यातील कोळी समाज आदिवासी आहे मात्र सवलती पासून वंचित यांची जाणीव मला आहे : अॕड प्रकाश आंबेडकर


