Headlines

जळगाव येथे सुरू असलेल्या  “आमरण अन्नत्याग सत्याग्रह ” आंदोलन पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार रमेशदादा पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा .श्री एकनाथजी शिंदे यांची तातडीने भेट 

जळगाव येथे जात पडताळणीसह विविध मागण्यांसाठी आदिवासी कोळी समाजातील बांधवांनी १० ऑक्टोबरपासून ” आमरण अन्नत्याग सत्याग्रह ” सुरू केले आहे. “आश्वासन नको … निर्णय द्या “असा एल्गार करत जोपर्यंत आमच्या मागण्यांची शासन दखल घेत नाही आणि ठोस आश्वासन देत ..तोपर्यंत आंदोलन सोडणार आहे … असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे ..

आज या आंदोलनाला १५ दिवसांपेक्षाही जास्त दिवस झाल्याने आंदोलनकर्त्यांची तब्येत खालावली आहे . याच पार्श्वभूमीवर आज आपण राज्याचे मुख्यमंत्री मा .श्री एकनाथजी शिंदे यांची तातडीने भेट घेऊन या आंदोलनाची दखल घेऊन लवकरात लवकर त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून निर्णय देण्यात यावा ..अशी भूमिका मांडली . यावेळी राज्याचे मंत्री श्री . गुलाबराव पाटील , अतिरिक्त मुख्य सचिव श्री.भूषण गगराणी हे देखील उपस्थित होते .

यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी आंदोलकांच्या मागण्यांबाबत सर्व बाबींचा अभ्यास करून सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासित केले .

➤ विनाअट आदिवासी कोळी समाजबांधवांना जातीचे दाखले नोंदींवरून सरसकट मिळावेत,

➤ रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना कोणतेही कागदपत्र न मागता जातवैधता प्रमाणपत्र मिळावे

➤ जातपडताळणी समितीचे कार्यालय कायमस्वरूपी जळगाव येथे करावे

यांसह विविध १० मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *