आज दि 28/10/2023 रोजी मौजे जढाळा ता चाकुर येथील कोळी महादेव समाज बांधवांनी आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त मंदिरात जमा होवुन वाल्मिकीच्या प्रतिमेचे पूजन समाजातील जेष्ठ नेते श्री गंगाधर चिखले यांच्या हस्ते केले. महर्षी वाल्मिकी जयंती महोत्सव समिती जढाळा अध्यक्ष क्रष्णा इंजनवाड यांनी आलेल्या गावातील मान्यवर लोकांचे स्वागत करून पुष्पहार शाल देवून स्वागत केले.
कार्यक्रम साजरा करण्यासाठी ज्ञानोबा कैले, मनोज चिखले, शिवाजी धडे, श्याम कजेवाड, संतोष कजेवाड, दगडु कजेवाड, संतोष मिरे, भरत नारायणवाड, विजय बरगले यांनी परिश्रम घेतले त्यांना माजी सरपंच पांडुरंग धडे यांनी मार्गदर्शन करून मिरवणूक ही शांतेत काढा असे आव्हान केले. कोळी समाज यांच्या सह इतर समाज बांधव ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.


