Headlines

आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती चिंचोली (भ.) तालुका निलंगा येथे साजरी..

निलंगा: आज कोजागिरी पौर्णिमा व महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने निलंगा तालुक्यातील भंगार चिंचोली येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी करण्यात आली .

जयंती उत्सव समितीच्या वतीने वाल्मिकी मंदिरात पूजन करून महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीस अभिषेक करून. आलेल्या प्रमुख पहुण्यापैकी कोळी महासंघाचे सहसचिव तथा आदिवासी कोळी क्रांती सेनेचे अध्यक्ष सतीश धडे आणि सुवर्णकार संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष मोहन पोतदार यांचे हस्ते वाल्मिकीच्या मिरवणुकी साठी तयार करण्यात आलेल्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांनतर महाप्रसादाचे वितरण तात्पुरत्या सभामंडपात करण्यात आले.

येथील समोरच्या जागेत सभमांडप ग्रामस्थांच्या देणगी आणि वर्गणीतून करण्याचा त्यासाठी महर्षी वाल्मिकी मंदिर ट्रस्ट स्थापन करून घेण्याची ही बाब मान्य करून नियोजबद्ध वेळेत सभामंडप बांधला जावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. अशी माहिती उत्सव समिती ने दिली.

यावेळी गावातील सरपंच ग्रामसेवक पोलीस पाटील असे अनेक मान्यवर उपस्थित होते त्याच बरोबर कोळी समाजा तील घराघरातील स्त्री पूर्ष सर्वजण उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिवाजी एकिले, हरिश्चंदर मुडे, दयानंद बोयने, किशोर नलमले , विक्रम बोयने,  मल्लिनाथ इकीले, मुड शरद आणि कोळी समाजातील युवा कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *