कोळी महादेव समाजाचा हक्काचा लढा! उपोषणकर्त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात”
निलंगा : (राजेंद्र पवार)- कोळी महादेव समाजाच्या विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभागी असलेले ८५ वर्षीय हरिश्चंद्र मुडे आणि माधव पिटले यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना समाजातील लोक आणि पोलिस प्रशासनाच्या मदतीने जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी आंदोलकांनी टि.सी., बोनाफाईड व वडिलधाऱ्या नातेवाईकांच्या आधारे जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे,…


