निलंगा प्रतिनिधी (नागेश आवले)- आज निलंगा उपविभागीय अधिकारी यांना कोळी महादेव जमातीचे प्रलंबित प्रस्ताव जात प्रस्ताव दाखल असून योग्य ते प्रमाणपत्र तत्काळ देण्यात यावेत अशी मागणी करणारे निवेदन निलंगा तालुक्यातील आदिवासी कोळी महासंघाचे वतीने देण्यात आले.प्रलंबित प्रस्ताव तात्काळ निकाली काढन्यायात यावेत अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा ही कोळी महासंघाच्या वतीने देण्यात आला.
निवेदन जशे दिले तसे…
प्रति ,
उपविभागीय अधिकारी साहेब .
उपविभाग निलंगा जिल्हा – लातूर
विषय : कोळी महादेव अनु. जमातीचे जात प्रमाणपत्राचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ निकाली काढणे बाबत.
महोदय,
वरील विषयास अनुसरून निवेदन करण्यात येते कि, निलंगा तालुक्यातील कोळी महादेव या जमातीचे जातीचे प्रमाणपत्राचे प्रस्ताव आपल्या कार्यालयात गेल्या वर्षभरापासून प्रलंबित आहेत. किरकोळ त्रुटी काढून जे जातीचे प्रमाणपत्र दिले जात नाही हे अन्यायी आहे. सध्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरु असून प्रवेशासाठी आणि इतर शासकीय सवलतीसाठी जातीचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याने आमच्या समाज बांधवाना अनेक अडचणींनांना सामोरे जावे लागत आहे. त्यास आपले कार्यालय जबादार आहे.
हा आमच्या कोळी महादेव जमातीच्या लोंकावर जाणीवपूर्व अन्याय केला जात आहे असे निदर्शनास येत आहे. त्याचा आमच्या संघटनेच्या वतीने निषेध करून आपणास विनन्ती करण्यात येते कि आपण समाजाच्या भावना समजून घेऊन कोळी महादेव जमातीचे जे प्रस्ताव प्रलंबित आहेतं ते तात्काळ निकाली काढून समबधितांस न्याय द्यावा हि विनंती. अन्यथा आपल्या कार्यालयाच्या समोर तिव्र आंदोलन काण्यात येईल याची दाखल घ्यावी .
आपले विश्वासू

यावेळी कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष पंडित फुलसुरे, ज्येष्ठ नेते सतीश धडे . वेंकट सारगे. अमोल सारगे.नागेश आवले. धनराज सूर्यवंशी .इंद्रजीत यादगिरी .ईश्वर नलमले. बब्रुवान पारेकर.सुधीर नलमले. नागेंद्र नलमले . अनिल दासरे . हरिचंद्र बोयणे . संजीव राजुरळे . अधिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते…..



