Headlines

अन्नत्याग आंदोलन मागे घ्या कृतीबद्ध कार्यक्रम आखून प्रश्न मार्गी लावू ,,,,माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर

निलंगा (म.नेता)मतदारसंघातील महादेव कोळी समजाचा प्रश्न सोडविण्यासाठी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक लावून किमान कालावधीत प्रश्न सोडवू असे अभिवचन सकल आदिवासी कोळी समाजाच्या आंदोलन कर्त्याना माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिले सकल आदिवासी कोळी समाजाचे उपविभागीय अधिकारी कार्यालया समोरील गत पाच दिवसा पासून चालू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला निलंगा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार…

Read More

जातप्रमाणपत्र द्या, अन्यथा परराज्यात हाकलून द्या” — महादेव कोळी समाजाच्या विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांना सडेतोड निवेदन

“निलंगा मतदारसंघातील विद्यार्थ्यांचे अन्नत्याग उपोषण चौथ्या दिवशीत; प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप” निलंगा ( प्रतिनिधी) “एकतर आम्हाला महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र द्या, अन्यथा आम्हाला कर्नाटकात वास्तव्यास परवानगी द्या,” अशी ठाम मागणी निलंगा मतदारसंघातील महादेव कोळी समाजाच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याची खंत या निवेदनातून व्यक्त करण्यात…

Read More

लातूर शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी हरिभाऊ सगरे यांची पुनश्च निवड

निलंगा:-(प्रतिनिधी)- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नूतन कार्यकारणी मध्ये शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबई येथून लातूर जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्यासह आज हरिभाऊ सगरे यांची उपजिल्हाप्रमुख निलंगा विधानसभा पदावर फेर निवड करण्यात आली आहे. मागील 27 वर्षापासून शिवसेना पक्षामध्ये कार्यरत असलेले शिवसेनेचे कडवट शिवसैनिक म्हणून ज्यांची निलंगा तालुक्यासह जिल्हाभरामध्ये ओळख आहे…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण* नागपूर, दि. १८ :- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे अनावरण करण्यात आले. https://home.maharashtra.gov.in/या नावाचे अद्ययावत असे संकेतस्थळ आता माहितीजालकावर उपलब्ध झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी झालेल्या गृह विभागाच्या बैठकीत संकेतस्थळाचे अनावरण झाले. या बैठकीस राज्याच्या मुख्य…

Read More

जनसामान्यांच्या विश्वासाला जीवापाड जपेन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,दि. 25 : आजवर अनेक चढ-उतार राजकारणात अनुभवावे लागले. मला राजकारणात यायचे नाही हा सुरुवातीला माझा मनोदय होता. तथापि लोकसेवेचे ते एक माध्यम आहे हे माझ्या वरिष्ठांनी बिंबवून मला नगरसेवक पदाच्या निवडणुकीत उतरविले. कार्यकर्त्यांच्या बळावर मी निवडून आलो. महापौर झालो. आमदार झालो. मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. पुन्हा निवडून आलो. बहुमत असतांनाही राजकीय गणितांच्या गोळा बेरिजेमध्ये…

Read More

कोळी समाजाने केले  युतीच्या बाजूने मतांचे ध्रुवीकरण भाजप महायुतीच्या  महाविजयात कोळी महासंघाचा खारीचा नव्हे सिंहाचा वाटा….

महाराष्ट्रात कोळी समाज बहुल असलेले विधानसभेचे ९७ मतदार संघ आहेत ज्यामध्ये ६५ मतदार संघात कोळी समाजाचे मतदान निर्णायक आहेत. या मतदारसंघात कोळी महासंघानं निवडणुकीच्या दरम्यान प्रचंड यंत्रणा राबविली. कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या उमेदवारांना या मतदार संघातून मतदान घडविण्यात आले. त्यामुळे महायुतीचे सर्व उमेदवार या…

Read More

भाजपा युती कोळी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध: देवेंद्र फडणवीस

दिनांक – ३० अक्टो. २०२४- मुंबई -कोळी महासंघाचे शिष्टमंडळाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची त्यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेऊन काही महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बांधवांचा जमातीचा दाखला अवैध ठरल्यावर त्यांना अधि संख्या पद निर्माण करून सेवा संरक्षण दिले आहे. त्याबरोबर राज्यातील सर्व आदिवासी कोळी बांधवांना जात वैधता सुलभ देण्याची प्रक्रिया…

Read More

ऐरोली येथील कोळी भवनाला निधी कमी पडून देणार नाही – मुख्यमंत्र्यांची ग्वाही

*ऐरोली येथील कोळी भवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न* ठाणे दि.२१: कोळी बांधव हा मनमोकळ्या स्वभावाचा आहे. त्याच्या मनात एक अन् पोटात एक असं कधीचं नसतं. कोळी बांधव प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करतात. कोळी भवन पुन्हा पुन्हा बांधता येत नाही, यांच्यासाठी भव्य दिव्य वास्तू उभी करा. पैशाची चिंता करण्याची आवश्यकता नाही, निधी कमी पडू…

Read More

मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी उमेदवारांसाठी रोजगाराभिमुख मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रवेश सुरु

मुंबई,दि. ६ : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे आणि MSME टेक्नॉलॉजी सेंटर – इंडो जर्मन टूल रूम (IGTR), अंतर्गत देण्यात येणा-या कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी पुढील तुकडीमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजाच्या दहावी / बारावी / आयटीआय / डिप्लोमा / डिग्री (इंजीनियरिंग) झालेल्या…

Read More

‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

  मुंबई दि. ६ : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक…

Read More