Headlines

विधानपरिषदेच्या मुंबई, कोकण विभाग पदवीधर तसेच नाशिक आणि मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर..

  ♦मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती…♦ मुंबई, दि. 26 : विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण विभागाच्या पदवीधर मतदारसंघासाठी तसेच नाशिक आणि मुंबई विभागाच्या शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणी ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. यासंदर्भात आज मंत्रालयात श्री. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची…

Read More

निलंगा तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांच्या हस्ते शिवसेना गणेश मंडळाच्या बाप्पांची आरती संपन्न..

निलंगा/प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथील शिवसेना गणेश मंडळाच्या वतीने श्री गणरायाच्या आरतीचा मान निलंगा तहसीलच्या तहसीलदार आदरणीय श्रीमती उषाकिरण शृंगारे ताई यांना देण्यात आला यांच्या शुभहस्ते आज सकाळची आरती संपन्न झाली यावेळी शिवसेना गणेश मंडळाच्या वतीने तहसीलदार शृंगारे ताई यांना वृक्ष लागवडीचा संदेश देण्यासाठी वृक्ष भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी शिवसेनेचे…

Read More

आपले सरकार २.० – पोर्टल ची कार्यपद्धती अद्ययावत, विहित मुदतीत सेवा नाही मिळाल्यास , आत्ता ऑनलाईन तक्रार ही करता येणार..

नागरिक आणि प्रशासन यांना ऑनलाईन संवाद साधण्यासाठी सेतू निर्माण करणारा ‘आपले सरकार २.०’ हा शासनाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. तसेच पी. जी. पोर्टल हे केंद्र शासनाकडून हाताळण्यात येणारी कार्यप्रणाली आहे. राज्यातील नागरिकांना त्यांच्या तक्रारींचे ऑनलाईन पद्धतीने एकाच ठिकाणी निवारण करुन घेता यावे, हा या एकत्रीकरणाचा हेतू आहे. राज्यातील नागरिकांसाठी ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करता यावी तसेच…

Read More

सयाजीराव गायकवाड – सारथी गुणवंत विद्यार्थी परदेश उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना

राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता असून आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येत नाही. यासाठी राज्य शासनाने आता पदव्युत्तर पदवी, पदविका तसेच पीएचडी अभ्यासक्रमासाठी क्यू वर्ल्ड रँकिंगमध्ये २०० च्या आत रँकिंग असलेल्या शैक्षणिक संस्था, विद्यापीठामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश घेणाऱ्या मराठा प्रवर्गातील एकत्रितपणे ७५ विद्यार्थ्यांसाठी सन २०२३ -२०२४ पासून छत्रपती शाहू…

Read More

मराठा समाजातील लक्षित गटासाठी सारथी मार्फत उच्च कृषी तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षणाचे आयोजन

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, अर्थात सारथीच्या माध्यमातून राज्यातील मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक  प्रगतीसाठी विविध कल्याणकारी उपक्रम, योजना व्यापक स्वरुपात राबवण्यात येत आहेत. त्यानुसार (सारथी ) पुणे मार्फत राज्यातील लक्षित गटातील शेतकऱ्यांना सारथी संस्थेच्या खर्चाने राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे, पुणे यांचेमार्फत हरितगृहातील व्यवस्थापन व अन्य 9…

Read More

‘मराठवाडा मुक्तिसंग्राम म्हणजे जुलमी सत्तेविरुद्ध जनतेचा लढा’ डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. सोमनाथ रोडे यांच्या प्रकट मुलाखतीतून मुक्तिसंग्रामाच्या इतिहासाला उजाळा

लातूर, दि. 15 (जिमाका): मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास हा प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा या लढ्याला होती. निजामाच्या अन्यायी जुलमी सत्तेविरुद्ध जनतेने दिलेले हा लोकलढा होता. या लढ्यात हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये विविध जाती-धर्माच्या लोकांनी बलिदान दिले, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे आणि ज्येष्ठ इतिहासकार डॉ. सोमनाथ रोडे…

Read More

नवकल्पनांना दहा लाखापर्यंत भांडवल

मुंबई, दि. 18 : नवीन संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागाकडून स्टार्टअप धोरण जाहीर करण्यात आले आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांच्या नव कल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी सोसायटीमार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले आहे. यात विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत भांडवल मिळणार आहे.   राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांचा शोध घेणे व त्याने नवउद्योजकतेचे स्वप्न…

Read More

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग तीनची रिक्त पदे १५ दिवसात भरणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 संचमान्य प्राध्यापक आणि वर्ग ४ च्या पदभरतीबाबतही लवकरच निर्णय लातूर, दि. 17 (जिमाका) : येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त जागाबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली असून येत्या 15 दिवसात वर्ग तीनच्या रिक्त जागा भरल्या जातील. तज्ज्ञ प्राध्यापकांच्या भरतीसाठी राज्यस्तरावर समिती नेमली आहे, त्यांचा अहवाल येताच संचमान्य प्राध्यापक यांची नेमणूक केली जाईल. तसेच वर्ग चारच्या पदांबाबतही आपण…

Read More

नागपुरात सुरु असलेल्या ओबीसी च्या साखळी उपोषणस्थळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट…

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, कोणताही अन्याय होणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, 16 सप्टेंबर : ओबीसी समाजाला असलेल्या आरक्षणात कोणतेही नवीन वाटेकरी येणार नाहीत आणि ते कमी देखील होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात दिली. राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि सर्वशाखीय ओबीसी कुणबी ओबीसी महासंघाच्या वतीने नागपुरात सुरु असलेल्या साखळी…

Read More

विधान परिषद सदस्य आमदार मा. श्री. रमेशदादा पाटील यांना कोळी महासंघ संघटने च्या माध्यमातून केलेल्या समाज कार्याबद्दल समाज भूषण पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला…

कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य आमदार मा. श्री. रमेशदादा पाटील यांना कोळी महासंघ संघटने च्या माध्यमातून केलेल्या समाज कार्याबद्दल समाज भूषण पुरस्कार 2023 प्रदान  करण्यात आला. नाशिक येथील सामाजिक संस्था “आदिवासी कोळी जमात बहुउद्देशीय डेव्हलपमेंट फाऊंडेशन नाशिक” यांच्या वतीने कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य आमदार मा. श्री. रमेशदादा पाटील…

Read More