निलंगा/प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथील शिवसेना गणेश मंडळाच्या वतीने श्री गणरायाच्या आरतीचा मान निलंगा तहसीलच्या तहसीलदार आदरणीय श्रीमती उषाकिरण शृंगारे ताई यांना देण्यात आला यांच्या शुभहस्ते आज सकाळची आरती संपन्न झाली यावेळी शिवसेना गणेश मंडळाच्या वतीने तहसीलदार शृंगारे ताई
यांना वृक्ष लागवडीचा संदेश देण्यासाठी वृक्ष भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी शिवसेनेचे निलंगा विधानसभेचे उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे विधानसभा प्रमुख शिवाजी पांढरे माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील शहर प्रमुख तथा गणेश मंडळाचे अध्यक्ष सुनील नाईकवाडे उपशहर प्रमुख संतोष मोघे माधव नाईकवाडे महिला आघाडीच्या
तालुका संघटिका सविताताई पांढरे उपतालुका संघटिका अरुणाताई माने शहर संघटिका दैवताताई सगर आधी शिवसेना पदाधिकाऱ्यासह शिवसैनिक उपस्थित होते.


