भागोजी शेठ कीर पुण्यतिथीनिमित्त भव्य रॅली, सहभोजन, सहभजन आणि समाजातील प्रतिभावंतांचा सत्कार, कोळी महासंघाचे युवा नेते चेतन पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
रत्नागिरी (प्रतिनिधी) : पतितपावन मंदिर हे भक्ती भूषण श्रीमान भागोजी शेठ कीर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मैत्रीचे प्रतीक आहे. भागोजी शेठ कीर यांच्याकडे जातीय भेदभावा पलीकडची मानवतेची दूरदृष्टी होती.पतितपावन मंदिर भागोजिनी बांधले, हे मंदिर सावरकरांनी बांधल्याची आठवीच्या पुस्तकातील चूक सरकारने दुरुस्त करावी, यासाठी शालेय शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधला आहे. ही चूक तातडीने…


