निलंगा (प्रतिनिधी) :-दि २४ मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगे सोयरे कायदा पारित करू असे आश्वासन देऊन मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या या सरकारचा निषेध करण्यासाठी मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आदेशाने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे तब्बल दोन तास रस्ता रोको करण्यात आला.
मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी गेली अनेक दिवस झाले अंतरवाली येथे आमरण उपोषण सुरू केले आहे,सरकाने सगेसोयरे कायदा पारित करावा,मराठा आरक्षण संदर्भात हैद्राबाद गॅजेट,बॉम्बे गॅजेट,सातारा संस्थानचे गॅजेट लागू करावे व महाराष्ट्रभर मराठा आरक्षण संदर्भात दाखल करण्यात आलेले गुन्हे सरसकट माघे घेण्यात यावे या मागणीसाठी ते आमरण उपोषण करत आहेत, सरकारने विशेष अधिवेशनात या सर्व मागण्या मान्य करू असा शब्द दिला होता तो शब्द सरकारने पाळला नाही अखंड मराठा समाजाचा सरकारने विश्वासघात केला असून लवकरचं मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्या या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
आज मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आदेशाने तालुक्यातील हलगरा औराद ताजपुर मुगाव मसाला नागपूर हैदराबाद हायवे मसलगा हासोरी भुतमूगळी अशा विविध गावासह छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथेही रास्ता रोको करण्यात आला यावेळी ह.भ.प. समाधान महाराज उमरगेकर यांनी आपल्या अध्यात्मिक वाणीने सरकारचा निषेध केला.तसेच सकल मराठा समाज बांधव यांच्यातर्फे अजित माने हरिभाऊ सगरे किरण पाटील प्रमोद कदम राजाभाऊ साळुंखे शंकर देशमुख यांनी अत्यंत शेलक्या शब्दात सरकारचा निषेध करत आरक्षणाचा सुरुवातीपासून चा इतिहास त्या ठिकाणी व्यक्त केला जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाहीं तोपर्यंत आम्हीं स्वस्थ बसणार नाही आश्या तीव्र भावना व्यक्त केल्या. त्याचबरोबर समाजाच्या वतीने सरकारमध्ये चाललेल्या चुकीच्या धोरणाचा निषेध करत आरक्षणाची मागणी केली. संविधानाने मराठा समाजाला कुणबी म्हणून अगोदरच आरक्षण दिलेले आहे परंतु जाणीवपूर्वक समाजाला या आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे बागायत शेती करणारा माळी समाज हा आरक्षणाचा लाभ घेतोय परंतु कोरडवाहू शेती करणारा कुणबी हा मात्र आरक्षणापासून वंचित आहे हे या महाराष्ट्रातील शोकांतिकाच म्हणावी लागेल जेव्हा जेव्हा एखादी नेतृत्व झुकत नाही मोडत नाही ऐकत नाही यशस्वीतेच्या उच्च शिखरावर पोहोचते तेव्हा तेव्हा त्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा घाट घातला जातो हा इतिहास आहे म्हणून आज मनोजरांगे पाटील यांच्यासारख्या प्रामाणिक नेतृत्वाला बदनाम केले जात आहे अशा फसव्या सरकारचा निषेध करत आपले विचार व्यक्त केले. यावेळी हे रस्ता रोको आंदोलन यशस्वी करण्यासाठी ईश्वर पाटील, किसनराव मोरे,विशाल जोळदापके,प्रदीप कदम, विनोद सोनवणे,धीरज शिंदे, परमेश्वर सोमवशी,बालाजी पाटील,संतोष घाडगे,महेश ढगे,ॲड तिरुपती शिंदे,अँड दत्तात्रय सोळुंके,मंगेश गाडीवान,माधव वाडीकर, बालाजी पाटील,भगवान जाधव,रितेश तांबोळी,धीरज नागरगोजे,गणेश गंगथडे, राजेश पवार, दत्ता जाधव, दत्ता ढाले,पापा उमट्वाडे,राजेश पवार, सचिन पवार, संतोष मोघे, लक्ष्मण सोळुंके असंख्य समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवून हा निषेध आंदोलन,रस्ता रोको यशस्वी केला.त्याचबरोबर मुस्लिम बांधवांच्या वतीनेही लाला पटेल, साजिद पटेल,असलम झरेकर, शकील बागवान,त्या ठिकाणी पाठिंबा देण्यात आला.
- *निलंगा तालुक्यातील गावागावात रास्ता रोको यामुळे तालुका ठप्पच*
- *रखरखत्या उन्हात आंदोलन सुरूच- घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दुमदुमला*


