“कोळी समाजाचा राजकीय आवाज बुलंद करा!”
मुंबईच्या किनाऱ्यावर शतकानुशतकांपासून वास्तव्य करणारा आद्य निवासी कोळी समाज* हा या शहराचा मूळ भू-निवासी आहे.
आमचा स्थानिक स्वराज्य आणि किनारी संसाधनांवरील नियंत्रणाचा हक्क हा नैसर्गिक आणि ऐतिहासिक अधिकार आहे.आज किनारी विकास प्रकल्पांच्या आडून आपल्या कोळीवाड्यांचे अस्तित्व,पारंपरिक मासेमारी हक्क आणि सांस्कृतिक ओळख धोक्यात आली आहे.यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोळी समाजाचे प्रतिनिधित्व निश्चित होणे अत्यावश्यक आहे.
मात्र, नगरविकास खात्याने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर केलेल्या अधिसूचनेत
कोळी समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाची तरतूद दिसून येत नाही ,
ही अत्यंत खेदजनक बाब आहे.संविधानाचे परिच्छेद / कलम 46“राज्य दुर्बल घटकांच्या, विशेषतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांना विशेष काळजी घेऊन प्रोत्साहन देईल आणि सामाजिक अन्याय आणि सर्व प्रकारच्या शोषणापासून त्यांचे संरक्षण करेल.”
पारंपारिक आणि दुर्लक्षित मासेमारी समुदाय म्हणून कोळी लोक या दुर्बल घटकाच्या व्याख्येत येतात.
त्यामुळे, आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये
प्रत्येक राजकीय पक्षाने कोळीवाडेनिहाय प्रभागातून कोळी उमेदवारांना* उमेदवारी द्यावी,हीच समाजाची आणि कोळी महासंघाची ठाम मागणी आहे.या अनुषंगाने प्रभागनिहाय इच्छुक उमेदवारांची यादी तयार करण्यात येत आहे.
जर आपण समाजाच्या सेवेसाठी पुढे यायचे ठरवले असेल, तर कृपया आपली माहिती लवकरात लवकर द्या.
📋 *आवश्यक माहिती:*
* उमेदवाराचे नाव
* कोळीवाडा आणि पत्ता
* मोबाईल नंबर / ई-मेल
* प्रभाग क्रमांक व नाव
* राजकीय पक्ष व पदनाम
* सामाजिक संस्थेतील पद
* निवडणुकीसाठी आवश्यक ५ ओळींची स्वतःची माहिती

आपली माहिती लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी.
कोळी महासंघाच्या वतीने त्या त्या पक्षप्रमुखांकडे मागणी व पाठपुरावा करण्यात येईल.
चला,आपल्या हक्कांसाठी, आपल्या ओळखींसाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी —
“ कोळी समाजाचे स्थानिक प्रतिनिधित्व निश्चित करूया!”
राजहंस विठ्ठल टपके – संपादक सागरशक्ती,सरचिटणीस, कोळी महासंघ
rajhanstapke@gmail.com


