Headlines

नवी मुंबईतील तळवली नाका येथे मा. आमदार रमेशदादा पाटील यांच्या आमदार निधीतून देण्यात आलेल्या नवीन ट्रान्सफॉर्म भाजपा मच्छीमार सेल अध्यक्ष ॲड. चेतन पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन…..

नवी मुंबईतील तळवली नाका येथे मा. आमदार रमेशदादा पाटील यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या नवीन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन मा. नगरसेवक तानाजी पाटील व भाजपा मच्छीमार सेल अध्यक्ष ॲड. चेतन पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

नवी मुंबईतील तळवली नाका येथील लाईटची समस्या अनेक वर्षांपासून येथील रहिवाशांना भेडसावत होती. वारंवार विजेची समस्या निर्माण होत असल्याने स्थानिक रहिवाशांना व व्यावसायिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे येथील रहिवाशांकडून मा. आमदार रमेशदादा पाटील यांच्याकडे विजेची समस्या सोडवण्याची मागणी होत होती. नागरिकांच्या होत असलेल्या मागणीमुळे मा. आमदार रमेशदादा पाटील यांनी याठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याकरीता व इतर विद्युत विषयक कामे करण्याकरीता आपल्या आमदार निधीतून ५० लाखाचा निधी मंजूर केला होता.

आज या ठिकाणी उभारण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरमुळे व इतर विद्युत विषयक कामे केल्याने या परिसरातील नागरिकांची वर्षानुवर्षे चालत आलेली विजेची समस्या सुटली आहे. सदरची विजेची समस्या सोडवून स्थानिक रहिवाशांना दिलासा दिल्याबद्दल उपस्थित रहिवाशांकडून रमेशदादा पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

याप्रसंगी अतिरिक्त कार्यकारी अभियंता वाशी श्री. जितेंद्र कुमार अंबादे, घनसोली विभागाचे सहायक अभियंता श्री. संतोष पालवे स्थानिक रहिवासी श्री. सनी टेलर, श्री. राहुल सोनवणे, श्री. सोमनाथ निचल, श्री. संतोष निचल, श्री. संजीव शिवगदले, श्री. कुणाल कांबळे, श्री. रमेश बोनागिरी तसेच स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *