Headlines

नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करावेत: शिवसेना निलंगा

निलंगा: तालुक्यातील अनेक गावामध्ये मागील आठ दिवसापासून सतत रात्रंदिवस संततधार पाऊस पडत आहे, नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांना मागणी केली आहे.
पावसामुळे उडीद, मूग, सोयाबीन व इतर पिकांमध्ये पाणीसाचून थांबल्यामुळे उडीद मूग झाडालाच उगवत असून त्याचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. सोयाबीन पाण्यात असल्यामुळे सोयाबीनच्या 50 ते 60 टक्के लागलेल्या शेंगा या नासून गेलेल्या आहेत त्यामुळे सोयाबीन चे उत्पन्न 50% कमी होणार आहे. सोयाबीन काढणीला महाग झाली आहे. नणंद , लंबोटा,काटेजळगा, गुंजरगा, निटुर, औराद या गावातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. यासंबंधीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले व तात्काळ

पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अन्यथा शिवसेना व युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना व युवासेनेच्या वतीने देण्यात आला. यावेळी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.अण्णासाहेब मिरगाळे, शहर प्रमुख सुनील नाईकवाडे शिवसेना उप तालुकाप्रमुख अमोल ढोरसिंगे, लखन बोंडगे प्रदीप पाटील, अल्पसंख्याक सेलचे तालुकाप्रमुख लायकपाशा शेख, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख दैवत सगर, नागीण सूर्यवंशी, पांडुरंग पाटील, अजय रेड्डी, प्रल्हाद रेडी, बाबुराव हुगे, मंगलताई कांबळे इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *