दि. 17 आगस्ट रोजी विश्रामगृह निलंगा येथे वंचित बहूजन आघाडी निलंगा वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्देय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाप्रमाणे व प्रदेश अध्यक्षा मा. रेखाताई ठाकुर, लातूर जिल्हा निरीक्षक सिद्धोधन सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि जिल्हाधक्ष सलीम भाई सय्यद, युवा जिल्हाधक्ष युवराज जोगी, महिला जिल्हाध्यक्षा मंजूषाताई निंबाळकर, जिल्हा महासचिव रोहित सोमवंशी साहेब यांच्या प्रमुख उपस्थित होऊ घातलेल्या निलंगा विधानसभा
निवडणुक व उमेदवार, बुथ बांधणी या प्रमुख विषयावर आढावा आणि मार्गदर्शन करण्यात आले व येणारी विधानसभेवर वंचितचा झेंडा लावल्याशिवाय शांत बसणार नाही असा विश्वास पदाधिकारी व कार्यकरत्यांनी दिला. श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेत्रत्वावर विश्वास ठेवून आणि तालूका अध्यक्ष सुनिल भाऊ सुर्यवंशी यांच्या सहकार्याने शेकडो निलंगा शहरातील मुस्लिम कार्यकरत्यांनी वंचित मध्ये जाहिर पक्ष प्रवेश केला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शाबोद्दीन मंठाळे, तालुका अध्यक्ष सुनिल भाऊ सुर्यवंशी, युवा तालुका अध्यक्ष स्वप्निल सुर्यवंशी तालुका महासचिव विजय उस्तुरे, उपाध्यक्ष संतोष सोनकांबळे, लक्षण कांबळे सल्लागार नागनाथ नरहारे, सिराज शेख, सोपान घोलप, सर्कल अध्यक्ष बालाजी वाघमारे, सद्दाम शेख, कीशोर कांबळे, संघटक नागनाथ हाणमंते, हजू सय्यद शहर अध्यक्ष दिनेश शिंदे, उपाध्यक्ष उमेश कोरे, आकाश दोरवे, देवानंद कटके, हे उपस्थित होते. व प्रामुख्खाने जांचा प्रवेश झाला ते नूर शेख, उजयफ तिलगुरे, इब्राहिम बीबराळे, मतीन मणियार, अकबर सय्यद, बिलाल बीबराळे, सुकेश कदम, श्रीरंग भोजने, असे शेअडो कार्यकरत्यांचा प्रवेश झाला.व सर्व व विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी वंचित बहूजन आघाडी निलंगा तालुका व शहर, पदाधिकारी, कार्यकरते मोठ्या संखेने उपस्थित होते.
विश्रामगृह निलंगा येथे वंचित बहूजन आघाडी ची निलंगा शाखेची बैठक संपन्न


