Headlines

विमा भरलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा शासनाने अनुदान द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करू – प्रा. मिरगाळे 

निलंगा- तालुक्यातील सन 2023 -24 खरीप मध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी केली आहे अशा शेतकऱ्यांनाच शासनाकडून सोयाबीनसाठी हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान शासनाने जाहीर केले आहे. पण काही शेतकरी आज्ञानी असल्यामुळे अँड्रॉइड मोबाईलवर ई पिक पाहनी करणे शक्य झाले नाही व काही शेतकरी पिक पाहणी करून सुद्धा शासनाच्या यादीमध्ये नावे आले नाहीत अशा सर्वच शेतकऱ्यांना सुद्धा शासनाकडून अनुदान द्यावे. आत्तापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना शासनाने अनुदान दिले आहे. शासन नवनवीन अटी टाकून शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित करत आहे. अशा जाचक अटी तात्काळ रद्द कराव्यात. तालुक्यातील हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत म्हणून पिक विमा भरलेल्या सर्वच शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ अनुदान द्यावे अन्यथा शिवसेना व युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांना दिला आहे. निवेदन देताना सोबत धनराज मुळे, तुकाराम यादव, खलील तीलगुरे, उल्हास बरदाळे, मनोज शिंदे इत्यादी शेतकरी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *