छत्रपती संभाजीनगर येथे कोळी महासंघ व राज्यातील सर्व कोळी समाज घटकांना एकत्र करून राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी सज्ज होत असलेले कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजप आमदार श्री . रमेशदादा पाटील यांच्या नेतुत्वाखाली मराठवाडा , विदर्भ व उत्तर महाराष्ट्र विभागीय विशेष चर्चासत्र संपन्न झाले .
लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या विशेष चर्चासत्रामध्ये सर्वच महासंघाच्या प्रमुख नेत्यांनी संघटन मजबुतीसाठी नव्या ऊर्जेने काम करावे असे आवाहन यावेळी केले .
समाजाचे प्रलंबित असलेले प्रश्न , गेल्या अनेक वर्षांपूर्वी प्रलंबित असलेला अनुसूचित जमातीचे दाखले हा कोळी महासंघाचा खरा केंद्रबिंदू आहे. कोळी जमात अनुसूचित जमातीमध्ये असताना देखील त्याचे लाभ सुलभरीत्या मिळू नये म्हणून उभ्या राहिलेल्या यंत्रणेला धक्का देण्यासाठी राजकीय एकजूट दाखविणे आवश्यक आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रातील संपूर्ण कोळी समाजाला राजकीय दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आगामी विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोळी महासंघाच्यावतीने उमेदवार उभे करण्यात येणार असल्याने सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यादृष्टीने तयारी करण्याच्या सूचना यावेळी नेत्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या .
.यावेळी श्री . रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत … ” तुम्ही बांधाल तेच तोरण…तुम्ही ठरवाल तेच धोरण …. असा जयघोष यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला .
याप्रसंगी कोळी महासंघाचे सरचिटणीस श्री .राजहंस टपके ,महासंघाचे उपनेते श्री .देवानंद भोईर ,महासंघाचे उपाध्यक्ष श्री .प्रभाकर सोनवणे ,श्री .विठ्ठलजी येरले , युवाप्रदेश अध्यक्ष अँड. चेतनदादा पाटील ,सहसचिव श्री .सतीश धडे ,श्री . सुरेश पाटकर , श्री .पहाडसिंग सुरडकर ,श्री .शंकर मनाळकर ,श्री .पंढरीनाथ पिठे ,श्री .बाळासाहेब सैंदाणे , श्री . चंद्रकांत घोडके यांच्यासह उत्तर महाराष्ट्र , विदर्भ व मराठवाडा येथील महासंघाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .


