Headlines

लोकसभा निवडणूक – २०२४ ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ कोळी महासंघाचा तळवली नवी मुंबई येथे संवाद मेळावा

ठाणे – (लक्ष्मण कोळी) ::ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारानिमित्त व नवी मुंबईतील कोळी बांधवांशी संवाद साधण्यासाठी नवी मुंबई – तळवली येथे कोळी महासंघ व नवी मुंबई कोळी समाज आयोजित कोळी समाज बांधवांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता .

याप्रसंगी ठाणे लोकसभा मतदारसंघ – महायुतीचे उमेदवार श्री . नरेशजी म्हस्के हे स्वतः कोळी बंधू – भगिनींशी संवाद साधण्यासाठी उपस्थित राहिले .

या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कोळी बांधवांना मार्गदर्शन केले. देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री .नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी – ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्री .नरेशजी म्हस्के यांना साथ देऊन मताधिक्याने निवडनू देण्याचे आवाहन समाजबांधवांना केले .

यावेळी समस्त कोळी बांधवांनी ” तिसरी बार मोदी सरकार ” च्या संकल्पपूर्ती साठी श्री . नरेशजी म्हस्के यांना जाहीर पाठिंबा दर्शवत … एकच निर्धार व्यक्त केला तो म्हणजे .. कोळी बांधवांच्या प्रगतीसाठी … विकासासाठी …. तीसरी बार मोदी सरकार !

याप्रसंगी नवी मुंबईचे माजी नगरसेवक श्री .तानाजी पाटील, कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष ॲड. युवा नेते श्री .चेतनदादा पाटील, मा .आमदार श्री.रवींद्र फाटक,नवी मुंबई शिवसेना जिल्हाध्यक्ष श्री .विजय चौगुले, मनसे नेते श्री .अभिजित पानसे, मा .महापौर सुषमाताई दंडे , युवासेना कार्याध्यक्ष श्री .पूर्वेश सरनाईक, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कोळी बंधु – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *