Headlines

विकास मोतीराम कोळी यांच्या , “मुंबई कोळ्यांची?” पुस्तकाचे प्रकाशन आमदार कपिल पाटील व आमदार रमेशदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न …

समुद्राचा सातबारा कोळ्यांच्या नावे करा : आमदार कपिल पाटील

मुंबई कोळ्यांची? पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

मुंबई दिनांक 20 ऑगस्ट मुंबईच्या नगररचनेच्या नावाखाली येथील स्थानिकांना चिरडून विकास साधला गेला त्यानेच कोळ्यांच अस्तित्व संपुष्टात आणल आहे आणि म्हणून उरला सुरला समुद्र त्यांच्या हक्काचा आहे. त्या समुद्राचा सातबारा कोळ्यांच्या नावे करा अशी जोरदार मागणी जनता दल युनायटेड चे राष्ट्रीय महासचिव आमदार कपिल पाटील यांनी केली .

वेसावा येथील चिल्ड्रन वेल्फेअर सेंटरच्या सभागृहात

मुंबई कोळ्यांची ? या विकास मोतीराम कोळी लिखित पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पार पडले त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश दादा पाटील सागर शक्ती या मासिकाचे संपादक राजहंस विठ्ठल टपके कोळी समाजाच्या अभ्यासक भगवान नामदेव भानजी, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमेनचे अध्यक्ष डॉ गजेंद्र भानजी आणि लेखक विकास मोतीराम कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले.

मुंबई कोळ्यांची या पुस्तकातील एका लेखाचा संदर्भ देऊन कपिल पाटील यांनी या सागरी बेटांवर कोळ्यांची दहशत एवढी होती की पोर्तुगीज आणि इंग्रजांनी देखील कोळीवाडे सोडून विकास करण्याचे मान्य केले तसे गॅझेट मध्ये नमूद केले आहे आणि म्हणूनच पोर्तुगीज इंग्रजांनी कोळीवाडे सोडून आपल्या विकासाचा अजेंडा राबविला होता मात्र आपण आपला इतिहास विसरून दुसऱ्यांचा इतिहास वाचतो म्हणूनच महाराष्ट्र शासन आणि महानगरपालिका विकासाच्या नावाखाली कोळी समाजाला उध्वस्त करीत आहेत. असे सांगून त्यांनी उध्वस्त झालेल्या या महामुंबईतील त्यांच्या पारंपारिक आणि नैसर्गिक हक्काच्या जागा जमिनी आणि समुद्राचे सातबारा त्यांचे नावे केले पाहिजे. असे सांगून *मुंबई ही कोळ्यांची ! नाही कुणाच्या मालकीची* अशी सुधारित घोषणा त्यांनी दिली.

 

वीस वर्षापासून सुरू असलेल्या मासिक सागर शक्ति या मासिकाने महाराष्ट्रातील कोळी समाजामध्ये राजकीय जाणीव जागृती प्रघल्प केली आहे या मासिकातूनच विकास कोळी यांनी लिहिलेल्या लेखमालेंचा संग्रह पुस्तक रूपाने प्रसिद्ध होत असल्याचे त्यांनी अभिनंदन करुन विकासाची संधी कोळी समाजाने हिसकावून घेतली पाहिजे असे आवाहन कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश दादा पाटील यांनी केले .

वर्सोवा हाय ग्रुपने आयोजित केलेल्या या समारंभात मुंबईसह कोकणातील सर्व प्रमुख समाज बांधवांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमाची प्रस्तावना आणि सूत्रसंचालन सागर शक्तीचे संपादक राजहंस टपके यांनी केले मुंबई कोळ्यांची ? या पुस्तकाचे लेखक विकास मोतीराम कोळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर आभार प्रदर्शन प्रवीण भावे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *