Headlines

सातत्य पूर्ण पाठपुरावा करणाऱ्या आमदार रमेशदादा पाटील यांचे आभार – जितेंद्र सपकाळे आदिवासी कोळी समाज समन्वय समिती प्रमुख जळगाव

संपादकीय मनोगत – गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रात कमी जास्त प्रमाणात आदिवासी कोळी समाज संघटनाच्या वतीने आंदोलने उपोषण चालू आहेत. त्या उपोषणाकडे लक्ष देत असतानाच आपल्या समस्या आणि भूमिका शासनाकडे मांडण्यासाठी  एकमेव प्रतिनिधी कोळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांचे पण सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत.. त्या पाठपुराव्या बद्दल आणि निर्व्याज निस्पृह धडपडीचे कृतज्तापूर्वक विवेचन जळगाव चे सामाजिक कार्यकर्ते  जितेंद्र सपकाळे यांनी लिहले आहे ते जसे च्या तसे ….

जय वाल्मीकी!!! जय आदिवासी!!!

जळगाव : ( जितेंद्र सपकाळे )महाराष्ट्रातील सर्व आदिवासी कोळी बांधवांना कळविण्यात येत आहे की ऑक्टोबर- नोव्हेंबर २०२३ ला जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 26 दिवस अन्नत्याग आमरण उपोषण विविध संघटनाच्या समन्वय समितीच्या माध्यमातून करण्यात आले होते व त्या वेळी शासनाकडे आदिवासी कोळी समाजाचे वतीने मध्यस्थी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा समाजाचे नेते सन्माननीय आमदार रमेशदादा पाटील यांनी केले त्यांच्या व अंदोलकाचे प्रतिनिधी यांचे माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबत दिनांक 20.10.2023 रोजी सखोल चर्चा व बैठक घेऊन तोडगा काढण्याच्या अनुषंगाने बैठक संपन्न झाली.

सदरच्या बैठकीच्या चर्चा नुसार अनुसूचित जमातीतील आदिवासी कोळी बांधवांना जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभ रित्या मिळण्याकरिता व रक्त नात्यात असलेल्या वैधता प्रमाणपत्राच्या आधारे त्यांचे पाल्यांना प्रमाणपत्र देण्याकरिता महाराष्ट्र शासनाने समिती गठित करण्याचे निर्णय घेतला आहे. त्याचा पाठपुरावा ही आमदार रमेशदादा पाटील करीत आहेत *त्यामुळे आम्ही सर्वांना कळवू इच्छितो की पुढच्या आठवड्यामध्ये आपण सर्वांनी केलेल्या तीव्र आंदोलन ,कष्टाचे योगदानाचे व मेहनतीचे स्वरूप म्हणून निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षते खालचा जीआर व रक्त नात्या संबंधित देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्राचा जीआर हा पुढच्या आठवड्यात महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून काढण्यात येणार असून,* अजूनही विविध ठिकाणी छोटी मोठी आंदोलने चालूच आहेत तरीही आपण सर्वांनी संयम ठेवावा.

*धुळ्यावरून जळगाव येथे अनुसूचित जमातीची कमिटी ही दोन दिवस काम करेल कार्यरत राहील याकरिता मान्यता मिळाली असून फाईल अंतिम टप्प्यात सही साठी आहे.* अशी माहिती आमदार रमेशदादा पाटील यांनी दिली आहे. आपल्या सर्व मागण्या या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून लवकरच पुऱ्या होत असल्याने कोणीही महाराष्ट्रामध्ये संयम सोडू नये व सर्व संघटना,समाज बांधव मिळून समन्वय समिति ने केलेल्या महाराष्ट्रातील सर्व बांधवांकरिता आंदोलनाला आपण पाठिंबा द्यावा आणि साथ द्यावी एवढीच विनंती करतो आणि आमदार रमेशदादांचे या सर्व गोष्टींमध्ये मोठा वाटा असल्याने व ते स्वतः पाठपुरवा करत आहेत त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो!!!

आपला समाज बांधव

श्री . जितेंद्र सपकाळे सर

(प्रमुख-आदिवासी कोळी आंदोलन समन्वय समिति)

9049033123

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *