बुलढाणा : बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या आदिवासी कोळी महादेव समाजाच्या आमरण उपोषणाची धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्याहस्ते (ST) अनुसुचित जमाती प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र देऊन सांगता करण्यात आली.
आदिवासी कोळी महादेव समाजाचे उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे सुरू असताना धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी सस्नेह भेट देऊन कोळी महादेव समाजाला अनुसूचित जमाती एस.टी प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता आज धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी केली, तसेच भविष्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्याची आवश्यकता जरी पडली त्याचा संपूर्ण देखील मी स्वतः करीन असे देखील यावेळी त्यांनी सांगितले…!
गेल्या २७ वर्षापासून प्रलंबित असलेल्या आदिवासी कोळी महादेव जमातीला जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी आदिवासी कोळी महादेव समाजाचे एल्गार अन्नत्याग आमरण उपोषणाला जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा समोर दिनांक- ०२ जानेवारी २०२४ पासून सुरुवात झाली होती, त्या उपोषणाला आज जवळपास ४३ दिवस पुर्ण झाले आहेत…!
आज दिनांक- १५ फेब्रुवारी, २०२४ रोजी *धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यानी कोळी महादेव जमातीचे त्यांच्या हस्ते जात प्रमाणपत्र* वाटप करून उपोषणकर्ते श्री गणेश इंगळे व श्री गजानन धाडे यांना शरबत देवून अन्नत्याग आमरण उपोषण सोडवण्यात आले….!
माननीय धर्मवीर आमदार श्री. संजुभाऊ गायकवाड यांच्या अथक प्रयत्नानंतर १९ जानेवारी २०२४ रोजी होणारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक रद्द झाल्यानंतर ताबडतोब त्यांनी मध्यस्थी करून दिनांक- २३ जानेवारी २०२४ रोजी संबंधित अधिकारी तसेच सर्व उपविभागीय अधिकारी बुलढाणा तथा जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली, यावेळी सदर बैठक धर्मवीर आमदार श्री.संजुभाऊ गायकवाड यांच्या मदतीने स्थगित करून त्यांनी ताबडतोब उपोषण मंडपस्थळी भेट देऊन असंख्य कोळी महादेव जमातीच्या समाजबांधवांना, महिलांना,विद्यार्थ्यांना, आश्वासन दिले होते की येणाऱ्या पंधरा दिवसात मी तुमचे जात प्रमाणपत्र मिळून देईल, ते आश्वासन आज धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी पूर्ण केले यावेळी उपस्थित सर्व समाज बांधवांनी धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांचे मनःपूर्वक आभार मानले यावेळी त्या ठिकाणी शिवसेनेचे शहरप्रमुख गजेंद्र दांदडे,श्री प्रशांत आढे, नंदु जाधव,सूरज झाल्टे, गंगाधर गाढे, स्वीय सहायक रोहित गवळी यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते….!


