दिनांक 26 11 2023: निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येते काल दिनांक 26 11 2023 रोजी महासंघाचे पदाधिकारी आणि औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली.
जयंतीच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आमदार अभिमन्यू पवार यांनी कोळी महासंघाचे उपाध्यक्ष शिवशंकर फुले आणि सहसचिव सतीश धडे यांनी तसेच प्रास्ताविकामध्ये प्रताप कावाली गुरुजी यांनी मांडलेल्या विविध मागण्याच्या संदर्भात सविस्तर उहापोह केला. आणि त्याने सांगितले की शासनाचा प्रतिनिधी जरी मी असलो तरी मी एवढा मोठा नाही की प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेऊ शकतो पण निर्णय घेणाऱ्या पर्यंत तुमच्या व्यथा पोहोचवण्याचं काम मी निश्चित तुमच्या अपेक्षा नुसार करीन वर्षा सभागृहामध्ये तुमच्या संघटनेचे अध्यक्ष आमदार रमेश दादा पाटील वारंवार हा प्रश्न मांडतात मी सुद्धा खालच्या सभागृहामध्ये म्हणजे विधानसभेमध्ये तुमच्या प्रश्नाला आज पर्यंत पाठिंबा देत आलेलो आहे यानंतरही मी परीने जेवढे शक्य होईल तेवढे यात लक्ष घालीन आणि या अधिवेशनामध्ये कोणी नाही मांडला तर मी स्वतः प्रश्न मांडून असे आश्वासन त्यांनी दिले.
त्यांच्या अगोदर कोळी महासंघाचे उपाध्यक्ष शिवशंकर फुले यांनी बोलताना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राच्या बाबत आदिवासी विभागाचे प्रशासन आणि शासनाच्या वतीने कसा अन्याय केला जातो हे सविस्तर सांगितले , तसेच समाजातील लोकांना आपला आर्थिक शैक्षणिक विकास करणं किती आवश्यक आहे याही बाबी याचा प्रयत्न केला.स्वतः आमदार हजर असल्याने भाजपाचे बरेच से ही पदाधिकारी हजर होते. त्यापैकी युवा मोर्चाचे अध्यक्ष व का बळकुंदा गावचे
सन्मानित व्यक्तिमत्व नितीन पाटील यांनी कोळी समाज हा भाजपाच्या बाजूने कायमस्वरूपी उभा असतो त्यांचे प्रश्न आपण सोडवणं आवश्यक आहे कोळी समाजाच्या वतीने विनंती केली. कार्यक्रमात कोळी समाज संदेश चे संपादक सतीश धडे यांनी छोटे से मनोगत व्यक्त करीत समाज बांधवांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन रानबा कावाले यांनी केले

.


