कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व विधानपरिषद सदस्य श्री रमेशदादा पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री श्री विजयकुमार गावित यांची भेट घेऊन छत्रपती संभाजीनगर येथे जात पडताळणी समिती सहआयुक्त पदावर कार्यरत श्रीमती संगीता चव्हाण यांची तात्काळ बदली करण्याबाबत पत्र दिले.
संगिता चव्हाण या जाणीवपूर्वक अनुसूचित जमातीतील बांधवांचे जात वैधता तपासणी प्रकरणे प्रलंबित ठेवत आहेत. तसेच अनुसूचित जमातीतील बांधवांवर अन्याय करीत असल्याच्या अनुसूचित जमातीतील बांधवांच्या तक्रारी आहेत. जात वैधता तपासणी प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे लोकांना नोकरीमध्ये शिक्षणाकरीता व अनेक शासकीय योजनांचा लाभ घेताना अनेक अडचणी येत आहे. त्यामुळे अनुसूचित जमातीतील बांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून त्यांनी चव्हाण यांची बदली करावी अशी मागणी सात्यत्याने केली जात आहे .कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील यांची आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित याच्याकडे सह आयुक्त यांच्या बदलीची मागणी…त्याच मागणीच्या अनुषंगाने श्री रमेशदादा पाटील यांनी त्यांच्या तात्काळ बदलीची मागणी केली आहे .




Best of luck