राज्यात हातभट्टी मुक्त गाव अभियान लवकरच राबविणार – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई
सोलापूर, दि. 28 (जिमाका) :- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने राज्यात मागील तीन-चार महिन्यापासून हातभट्टी विरोधी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेमुळे इतर मद्याच्या विक्रीत चांगली वाढ झालेली आहे. तरी राज्यात हातभट्टी मुक्त गाव अभियान राबविण्याबाबत शासन स्तरावरून लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असून या अभियानात सहभागी होणाऱ्या गावांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन…


