Headlines

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  विधिमंडळात मराठा आरक्षणावरील चर्चेच्या उत्तरात ग्वाही नागपूर, दि. १९ : – राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, याचा पुनरूच्चार करतानाच राज्य मागासवर्ग आयोगाचा सादर झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास फेब्रुवारी 2024 मध्ये विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. मराठा आरक्षणाबाबतच्या…

Read More

ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांनी तीस दिवसांत ट्रू-व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक

मुंबई, दि. 22 (रा.नि.आ) : राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांनी अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी निवडणूक निकाल लागल्यापासून तीस दिवसांच्या आत ट्रू व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.   राज्यातील 2 हजार 352 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच थेट सरपंचपदाच्या 130 रिक्त जागा व 2 हजार 950 सदस्यपदाच्या रिक्त जागांच्या…

Read More

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे शिवडीत २५ नोव्हेंबरला आयोजन

मुंबई, दि. १६ : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर कार्यालयामार्फत शिवडी येथील प्रबोधनकार ठाकरे महानगरपालिका शाळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील नोकरी इच्छुक बेरोजगार युवक आणि युवतींसाठी रोजगार…

Read More

आदिवासी संस्कृती टिकवायची असेल तर बोली भाषेची समृद्धी जोपासावी लागेल – राज्यपाल रमेश बैस

नंदुरबार, दिनांक १५ नोव्हेबर २०२३ : इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे लोक त्यांच्या बोली भाषेपासून दूर जात आहेत, आपल्या बोली भाषा नाहीशा झाल्या तर संस्कृती नष्ट होईल. म्हणून नवीन पिढीला मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषा शिकण्याबरोबरच आपल्या बोली भाषा समृद्धपणे जोपासण्याचे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. ते आज नंदुरबार येथे राज्यस्तरीय जनजातीय गौरव दिवस व…

Read More

शिरूर ताजबंद येथे महर्षी वाल्मिकी जयंती, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच प्राध्यापक डॉक्टर खानापुरे सरांची कार्यशाळा संपन्न..

अहमदपूर : दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रोजी बालाजी मंदिर च्या सभागृहात शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर येथे आद्य कवी महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच समाज जागृतीसाठी कोळी समाजातील अभ्यासक प्राध्यापक खानापुरे यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बाबासाहेब पाटील उपस्थित होते. पहिल्या सत्रामध्ये मान्यवरांची मनोगत व्यक्त करताना…

Read More

बीड येथे कोळी महासंघाची जिल्हा पदाधिकारी बैठक

 बीड: आज बीड येथे कोळी महासंघाची बैठक शिवाबा लाँन्स या ठिकाणी झाली कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश दादा पाटील यांच्या सुचनेनुसार संघटनेतील उर्वरित पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली .या बैठकीत बीड जिल्हाध्यक्ष महादेव कंडुकटले , बीड लोकसभा अध्यक्ष गोरख पुरणे यांनी बीड, युवा जिल्हा अध्यक्ष पदी अभिजीत कोंबडे यांची निवड करण्यात आली बैठकीत विविध सामाजिक…

Read More

धुळे ते मंत्रालय आदिवासी कोळी बांधवांची संघर्ष पदयात्रा….आदिवासी वाल्मीकलव्य सेनेचा पुढाकार  

धुळे:आदिवासी टोकरे कोळी ,मल्हार कोळी, कोळी महादेव इत्यादी आदिवासी कोळी समाजाचा नाय हक्कासाठी आदिवासी वाल्मीकलव्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच शिवसेनेचे धुळे जिल्हा उपप्रमुख शहाणा भाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली धुळे ते मंत्रालय मुंबई या संघर्ष पदयात्रेला कालपासून सुरुवात झाली धुळे शहरातील एकवीरा देवीच्या मंदिरापासून सुरू झालेल्या या पदयात्रेत कोळी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. अनेक…

Read More

तरूण उद्योजकांचा मार्गदर्शक हरपला – अतुल बेडेकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई, 3 नोव्हेंबर – व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांच्या निधनाने महाराष्ट्रातील तरूण मराठी उद्योजकांचा मार्गदर्शक हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, बेडेकर हे नाव माहीत नाही असा मराठी माणूस दुर्मिळ. त्यांनी आपल्या पारंपरिक व्यवसायाला कार्पोरट करतानाच त्यातील चव मात्र अस्सल…

Read More

राज्य कला प्रदर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने कलाकृती पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. 13 : राज्य कला प्रदर्शनाचे यंदाचे 63 वे वर्ष आहे. येत्या 20 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत जहांगीर आर्ट गॅलरी येथे होणाऱ्या प्रदर्शनासाठी राज्यातील कलाकारांकडून ऑनलाईन पद्धतीने कलाकृती मागविण्यात येत असल्याची माहिती प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांनी दिली आहे. रेखा, रंगकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी राज्याचे रहिवाशी असलेल्या…

Read More

सिंचन प्रकल्पांची कामे त्वरित पूर्ण करावीत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि ७ :- राज्याची सिंचन क्षमता वाढण्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजनेतील प्रकल्पांची कामे कालबद्ध कार्यक्रम आखून लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजना यासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश…

Read More