अहमदपूर : दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रोजी बालाजी मंदिर च्या सभागृहात शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर येथे आद्य कवी महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच समाज जागृतीसाठी कोळी समाजातील अभ्यासक प्राध्यापक खानापुरे यांची
कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बाबासाहेब पाटील उपस्थित होते.
पहिल्या सत्रामध्ये मान्यवरांची मनोगत व्यक्त करताना बाबासाहेब पाटील यांनी आदिवासी कोळी समाजाच्या मी कुठल्या अडचणीच्या संदर्भात माझ्याकडे जो येईल त्यांना मी मदत करत असतो भविष्यातही मी आपल्या सोबत आहे असे
आश्वासित करून महर्षी वाल्मिकींच्या जीवनातील चांगले प्रसंग सांगून आपणही कसे आदर्श जीवन जगावे याचा आदर्श घ्यावा असे मार्गदर्शन केले . त्यांच्या मनोगत नंतर महर्षी वाल्मिकी जयंती निमित्ताने आदिवासी कोळी जमातीतील गुणवंत विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांचा सत्कार संयोजन समितीचे वतीने करण्यात आला. 
दुसऱ्या सत्रामध्ये प्राध्यापक खानापुरे यांनी त्यांच्या कार्यशाळेस दृकश्राव्य माध्यमातून सुरुवात करून त्यांच्याकडील जनगणनेचे गॅजेटचे जुने पुरावे सामाजिक क्षेत्राचे जुने अभ्यासक कॅप्टन मेकिंटोश , सय्यद शिराज उल हसन, जी.एस. घुर्ये यांनी लिहिलेल्या सर्वेक्षणातील महत्त्वाच्या लेखांचा संदर्भ घेऊन मराठवाड्यातील कोळी समाज हा खरा आदिवासी महादेव कोळी समाज आहे आज जे स्वतःला कोळी महादेव म्हणतात ते मराठवाड्या तूनच तिकडे विस्थापित झालेले आहेत. इकडून हे तिकडे गेले आणि या मूळ लोकांना बोगस ठरवण्याचा उपद्व्याप ते करतात तो कसा चुकीचा आहे हे त्यांनी संदर्भासहित पुरावे देऊन सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन लातूरच्या महर्षी वाल्मिकी आदिवासी कोळी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने केले होते, की नांदेड च्या च्या कर्मचारी संघटनेने केले होते हे गुपित अजून कळणे बाकी आहे. हळू हळू ते व्हॉट्स ॲप च्या माध्यमातून कळेलच ?
पहिल्या सत्रात अदिम जमात संस्थेचे दत्ता सुरवसे कोळी महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष शंकर मणाळकर नांदेड चे जिल्हाध्यक्ष राम मालेवाड , तसेच लातूर जिप चे माजी अध्यक्ष ज्ञानोबा घुमंनवाड कोळी राष्ट्र संघाचे गोकुळ कोळी वीज तांत्रिक कर्मचारी संघटनेचे राम वाडकर यांनी तर दुसऱ्या सत्रात कोळी महासंघाचे उपाध्यक्ष शिवशंकर फुले व सहसचिव सतीश धडे यांनी उपस्थित राहून या जयंती निमित्त झालेल्या जन जगृती कार्यशाळेत सहभाग नोंदवला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहमदपूर जवळील नांदेड जिल्ह्यातील कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते माधव रेडेवाड, संदीप चीमलवाड आणि विजय खोडेवाड यांनी फार मोठे कष्ट घेतले असल्याचे स्थानिक संयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरलीधर हंबर्डे यांनी केले तर प्रास्ताविक विजय खोडेवाड यांनी केल्याचे सांगण्यात आले..


