Headlines

मराठा आरक्षण संदर्भात मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळ स्थापन

मुंबई, दि. ८ : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय व इतर न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये शासनास कायदेशीर बाबीसंदर्भात मार्गदर्शनपर सल्ला देण्यासाठी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले (निवृत्त) उच्च न्यायालय अलाहाबाद यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळ स्थापन करण्यास  मान्यता देण्यात आली आहे. न्यायमूर्ती  मारोती गायकवाड (निवृत्त) न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांची  सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे….

Read More

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना १७०० कोटी रुपयांचे अनुदान

मुंबई दि.८ :  सामाजिक न्याय विभागाने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या दोन्ही योजनांच्या  सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी १७०० कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. राज्यातील लाभार्थ्यांना दरमहा वेळेवर अनुदान मिळावे यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी रु.६०० कोटी तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत रु. ११०० कोटी असा एकूण…

Read More

ॲड.ओमगशद (मनोज) बोईनवाड –  यांची आखिल भारतीय कोळी समाज दिल्ली या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश युवाध्यक्षपदी नियुक्ती 

छत्रपती संभाजी नगर : छत्रपती संभाजी नगर येथील उच्च न्यायालयाचे वकील , वकिली बरोबर  सामाजिक कार्य ही करणारे , अँड.ओमगशद (मनोज) बोईनवाड  ( विधीज्ञ, हायकोर्ट, औरंगाबाद ) यांची आखिल भारतीय कोळी समाज दिल्ली,  या राष्ट्रीय संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश युवाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.महाराष्ट्रातील प्रामुख्याने मराठवाड्यातील आदिवासी  कोळी महादेव,कोळी मल्हार, टोकरे कोळी या जमातीच्या प्रश्नासाठी सतत…

Read More

कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार – पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई दि. ४ : कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या विविध अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येतील अशी माहिती महसूल,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या समस्याबाबत बैठक पार पडली. त्यावेळी मंत्री श्री. विखे पाटील बोलत होते. यावेळी शेतकरी नेते पाशा पटेल, रघुनाथ दादा पाटील, इंद्रीस नायकवाडी यांच्यासह विविध कुक्कुटपालन सहकारी…

Read More

जळगाव येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आमरण उपोषण स्थगित करण्यात आले… कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ज्यूस देवून उपोषण कर्त्याणी उपोषण सोडले

जळगाव:-आदिवासी कोळी महादेव, टोकरे कोळी , मल्हार कोळी या अनुसूचित जमातीच्या जळगाव येथील समाज बांधवांनी गेली 26 दिवस अन्नत्याग आमरण उपोषण प्रारंभ करण्यात  आले होते.त्याच अनुषंगाने 20 ऑक्टोबर 2023 रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय आमदार रमेशदादा पाटील यांच्या प्रयत्नाने , आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित गिरीष महाजन  अनिल पाटील या मान्यवरांसह…

Read More

आँर्गनाईझेशन फाँर राईट्स आँफ ह्युमन (आँफ्रोह), नाशिक, महाराष्ट्र. या सामाजिक संघटनेचां जळगाव जिल्ह्यातील अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा

नाशिक:दिनांक 03/11/2023 रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आँर्गनाईझेशन फाँर राईट्स आँफ ह्युमन (आँफ्रोह), नाशिक, महाराष्ट्र. या सामाजिक संघटनेकडून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळगाव जिल्ह्यातील शिलेदार जगन्नाथ बाविस्कर, पद्माकर कोळी, संजय कांडेलकर, नितीन कांडेलकर, नितीन सपकाळ,सुनीताताई तायडे, पुष्पाताई कोळी आणि अन्य समाज बांधवांच्या अन्नत्याग आंदोलनास जाहीर पाठींबा देऊन नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी साहेब यांच्या वतीने नायब तहसीलदार जगताप…

Read More

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट

  मुंबई, दि. 3 : राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे प्रभारी अध्यक्ष अरुण हलदर यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. आपल्या मुंबई भेटीत आयोगाने अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील विविध योजना आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतल्याची माहिती हलदर यांनी राज्यपालांना दिली. आयोगाच्या सदस्य डॉ अंजू बाला व…

Read More

मंत्रिमंडळ निर्णय अक्टोबर २०२३ निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला

निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु मराठवाड्यातील निजामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल आज राज्य मंत्रिमंडळाने स्वीकृत केला.  अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या अहवालामध्ये निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीने नमूद केल्याप्रमाणे मराठवाड्यातील…

Read More

शेळी पालनातून महिला बचतगटांचे होईल सक्षमीकरण व थांबेल कुटुंबांचे स्थलांतर : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दिनांक 3 नोव्हेंबर 2023 : केंद्र सहाय्य योजनेतून महिला बचत गटांना शेळी गट वाटपाची योजना आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असून, शेळी पालन व्यवसायाला चालना देण्यासोबतच आदिवासी महिला बचत गटांचे सक्षमीकरण तसेच या भागातील कुटूंबांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. ते…

Read More

प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२३ – २४ मध्ये शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन

मुंबई, दि. 2 : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामासाठी 3 वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यात शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहे. रब्बी हंगाम 2023-24 मध्ये या योजनेतील सहभाग हा कर्जदार तसेच…

Read More