छत्रपती संभाजी नगर : छत्रपती संभाजी नगर येथील उच्च न्यायालयाचे वकील , वकिली बरोबर सामाजिक कार्य ही करणारे , अँड.ओमगशद (मनोज) बोईनवाड ( विधीज्ञ, हायकोर्ट, औरंगाबाद ) यांची आखिल भारतीय कोळी समाज दिल्ली, या राष्ट्रीय संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश युवाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्रातील प्रामुख्याने मराठवाड्यातील आदिवासी कोळी महादेव,कोळी मल्हार, टोकरे कोळी या जमातीच्या प्रश्नासाठी सतत झटणारे , न्यायालयातही गोरगरीब आदिवासी कोळी जमातीची बाजू भक्कमपणे मांडणारे ॲड.ओमगशद बोईनवाड हे अखिल भारतीय कोळी समाज संघटनेने दिलेल्या जबाबदारीने आपल्या सामजिक कार्यात जास्तीचे प्रयत्न करून मराठवाड्यातील आदिवासी कोळी समाज बांधवांना न्याय मिळवून देतील ही कोळी समाज संदेश कडून अपेक्षा व्यक्त करून त्यांना कोळी समाज संदेश परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो. सतिष धडे संपादक कोळी समाज संदेश



Congrechulation sirji💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐