जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी बांधवांच्या अन्नत्याग आंदोलनास जाहीर पाठींबा – नाशिक येथील आदिवासी कोळी समाज बांधवांच्या वतीने महसूल उपायुक्तांना निवेदन
काल दिनांक 26/10/2023 रोजी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालय नाशिकरोड येथे कोळी समाज बहुउद्देशीय डेव्हलपमेंट फाऊंडेशन नाशिक कडून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी बांधवांच्या अन्नत्याग आंदोलनास जाहीर पाठींबा देऊन नाशिक महसुल विभागीय उपायुक्त मा. काळे साहेब यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री. मा. उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर देण्यात आले. जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 10/10/2023 पासून…


