Headlines

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी बांधवांच्या अन्नत्याग आंदोलनास जाहीर पाठींबा – नाशिक येथील आदिवासी कोळी समाज बांधवांच्या वतीने महसूल उपायुक्तांना निवेदन

काल दिनांक 26/10/2023 रोजी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालय नाशिकरोड येथे कोळी समाज बहुउद्देशीय डेव्हलपमेंट फाऊंडेशन नाशिक कडून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी बांधवांच्या अन्नत्याग आंदोलनास जाहीर पाठींबा देऊन नाशिक महसुल विभागीय उपायुक्त मा. काळे साहेब यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री. मा. उपमुख्यमंत्री  यांना निवेदन सादर देण्यात आले.

जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 10/10/2023 पासून कोळी जमातीवर होणार्‍या अन्यायाबाबत म्हणजेच जात प्रमाणपत्र आणि जात वैधता (पळताळणी) प्रमाणपत्रे मिळत नसल्यामुळे घटनेनुसार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 342 व्या कलमानुसार घटनादत्त अधिकार दिलेले आहेत. “कोळी” नोंदीवरुन अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळावे व इतर मागण्या संदर्भात जळगाव येथील अन्नत्याग आंदोलनास “आदिवासी कोळी जमात बहुउद्देशीय डेव्हलपमेंट फाऊंडेशन नाशिक” या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते व इतर संघटनेचे पदाधिकारीसहीत अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा देत आहोत. जर आमच्या मागण्यांचा विचार झाला नाही तर आम्ही सर्व नशिक जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज संघटनेतील पद्दधिकरी ही “अन्नत्याग आंदोलनास” बसतील याची शासनाने नोंद घ्यावी.

यावेळी कोळी जमातीचे जेष्ठ नेते किसन सोनवणे यांनी सांगितले की जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 10 / 10 / 2023 पासून जातप्रमाणपत्र आणि जात वैधता (पळताळणी) प्रमाणपत्र सुलभरितीने मिळावे. 1950 पुर्वीचा पुरावा मागतात तसेच निजामकालीन पुरावे व महसुली पुरावे देऊन सुध्दा प्रांताधिकारी व जात पडताळणी येथे अपील करून आपले प्रकरण निघू शकतात. अपील करून काहीही साध्य होत नसून जातपळताळणी समीत्याच बेकायदेशीर असल्याचे किसन सोनवणे यांनी सांगितले असता उपायुक्त मा.काळेसाहेबांनी सांगितले की आपला विषय हा शासन दरबारी सुटू शकतो.

जळगाव येथे आमरण उपोषण चालू आहे, जिल्हाधिकारी साहेब हे उपोषणकर्ते यांची दखल घेत नसून आदिवासी कोळी समाजाचे उपोषण कर्ते यांची तब्येत खालावली असून आपल्या स्तरावरून जिल्हाधिकारी जळगाव आणि तेथील प्रशासनाने दखल घ्यावी अशी विनंती केली आहे.

या प्रसंगी कोळी समाज बहुउद्देशीय डेव्हलपमेंट फाऊंडेशन नाशिकचे संस्थापक युवराज सैंदाणे, अध्यक्ष नितीन शेवरे, कोळी महासंघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष गुलाबराव गांगोडे, उपाध्यक्ष गणेश राजकोर,समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष किसन सोनवणे, अखिल भारतीय कोळी समाज परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय शिंदे, महाराष्ट्र आदिवासी कोळी जमात एकता मंचचे उपाध्यक्ष सुरेश नवसारे, कोळी महासंघाचे संघटन महेंद्र सौंदाणे, आफ्रोह संघटनेचे जिल्हाध्यक्ष यु. शं. गटलेवार, किशोर नेवरे, सुरेश वाघ, विनोद ढोरे, प्रकाश सुर्यवंशी, शांताराम मारू, नंदलाल कोळी, लक्ष्मण कोळी आणि समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *