महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे उपस्थितीत आज दुपारी दोन वाजता आदिवासी कोळी संघटनांची मुंबई येथे बैठक.
आदिवासी कोळी महादेव, टोकरे कोळी ,डोंगर कोळी, मल्हार कोळी यांच्या न्याय मागण्या करिता गेल्या दहा दिवसापासून जळगाव येथे आंदोलन सुरू आहे. कोळी महासंघ तसेच इतर छोट्या मोठ्या महाराष्ट्रातील विविध संघटनांचे वतीनं विविध जिल्ह्यांमध्ये छोटी मोठी आंदोलने निवेदन देणे चालूच आहे.
आंदोलनाच्या पाचव्या दिवशी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन जी आणि कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश दादा पाटील यांनी अन्नत्याग आंदोलनात सहभागी असलेल्या सहाय्य आंदोलकाची भेट घेतली आणि त्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तसेच कोळी महासंघाचे
अध्यक्ष रमेश दादा पाटील यांच्या अथक प्रयत्नाने आज 20 ऑक्टोबर 2023 रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत आदिवासी कोळी महादेव मल्हार कोळी टोकरे कोळी डोंगर कोळी आधी जमातीच्या प्रमाणपत्राच्या बाबत तसेच जात वैधता प्रमाणपत्राच्या बाबत जो वर्षानुवर्ष अन्याय होत आहे.
तोडगा काढण्यासाठी ची बैठक आज दुपारी दोन वाजता सह्याद्री अतिथी अतिथी गृह येथे होणार आहे.
या बैठकीस आदिवासी विकास मंत्री आणि विभागाचे सचिव सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत या संबंधीची माहिती कोळी महासंघाच्या मुंबई येथील मुख्यालयातून आम्हास प्राप्त झालेली आहे दोन वाजता शिष्टमंडळासह बैठक होणार हे निश्चित झालेले आहे. #सतिष_धडे संपादक




Great work from