कोळी समाजाने केले युतीच्या बाजूने मतांचे ध्रुवीकरण भाजप महायुतीच्या महाविजयात कोळी महासंघाचा खारीचा नव्हे सिंहाचा वाटा….
महाराष्ट्रात कोळी समाज बहुल असलेले विधानसभेचे ९७ मतदार संघ आहेत ज्यामध्ये ६५ मतदार संघात कोळी समाजाचे मतदान निर्णायक आहेत. या मतदारसंघात कोळी महासंघानं निवडणुकीच्या दरम्यान प्रचंड यंत्रणा राबविली. कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या उमेदवारांना या मतदार संघातून मतदान घडविण्यात आले. त्यामुळे महायुतीचे सर्व उमेदवार या…


