ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांनी तीस दिवसांत ट्रू-व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक
मुंबई, दि. 22 (रा.नि.आ) : राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांनी अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी निवडणूक निकाल लागल्यापासून तीस दिवसांच्या आत ट्रू व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. राज्यातील 2 हजार 352 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच थेट सरपंचपदाच्या 130 रिक्त जागा व 2 हजार 950 सदस्यपदाच्या रिक्त जागांच्या…


