भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्यात महाराष्ट्रातील उत्पादनांना मागणी मसाले, गूळ, हळद, मध, पैठणी, मनुका, कोल्हापुरी चप्पल खास मागणी…
नवी दिल्ली, दि.24 : कोल्हापूरचा मसाला, गुळ, चप्पल, सांगलीची हळद, मनुका, चटई, नागपूरचे संत्रे, महाबळेश्वरचे मध, पैठणची पैठणी यासह राज्यातील विविध पारंपरिक वस्तुंना भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्यात वाढती मागणी मिळत आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वतीने भारतीय उद्योग प्रोत्साहन संस्था अर्थात आयटीपीओच्या वतीने देशाची राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावर भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्याचे दरवर्षी 14 ते 27…


