Headlines

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्मंडळाने उपसभापती निलमताई गोऱ्हे यांना दिले निवेदन

मुंबई व महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आमदार श्री रमेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने मुंबई येथे विधानपरिषद उपसभापती मा . डॉ. नीलम ताई  गो-हे यांची भेट घेऊन संबंधित विभागाचे मंत्री महोदय व अधिकाऱ्या समवेत आपल्या अध्यक्षतेखाली एक संयुक्त बैठक आयोजित करण्याबाबत निवेदन दिले .

निवेदनातील  प्रमुख मागण्यां… 

■ अनुसूचित जमातीतील कोळी महादेव , मल्हार कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी व इतर तत्सम जमातीच्या बांधवांना जात प्रमाणपत्र सुलभ मिळावे

■ जात पडताळणी समित्यांमध्ये पारदर्शकता आणण्याकरिता वरिष्ठ पातळीवर एक समिती गठित करण्यात यावी

■ अदिवासी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ अनुसूचित क्षेत्रातील प्रमाणेच अनुसूचित क्षेत्राबाहेरील आदिवासी बांधवांना देखील मिळावा

■ सर्व आदिवासी बांधवांची जातीय जनगणना प्रक्रिया करण्यात यावी.

■ जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता रक्तसंबंधातील नातेवाईकांचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरीता रक्तसंबंधातील नातेवाईकांचे वैधता प्रमाणपत्र ग्राह्य धरून इतर कागदपत्रांची मागणी न करता यामध्ये सहजता यावी .

या मागण्या सोबतच अनुसूचित जमाती आदेश क्रमांक – १०८/१९७६ मधील अ. क्र. २८.२९, ३० कोळी महादेव , कोळी मल्हार , या जमाती ह्या कोळी जेनेरिक टर्मचे डिव्हिजन असल्याचे परिपत्रक निर्गमित अशी देखील मागणी आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने गो-हे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे

लवकरच आपल्यास्तरावर एक संयुक्त बैठक आयोजित करून समाजबांधवांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार श्री रमेशदादा पाटील यांनी मा .डॉ. नीलम गो-हे यांच्याकडे केली .

यावेळी विधानपरिषद उपसभापती मा . डॉ. नीलम ताई गो-हे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून विषय समजवून घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला . तसेच हे देखील आश्वासित केले कि , यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह संबधीत विभागाचे सचिव , अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल तसेच याबाबत संयुक्त बैठक लवकरच आयोजित करण्यात येईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *