Headlines

वंचित आघाडी च्या पदाधिकारी यांची निलंगा येथे बैठक – लातूर ची सभा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा – सुनील सूर्यवंशी तालुकाध्यक्ष

दि. 24 सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामग्रह, निलंगा येथे वंचित बहुजन आघाडी निलंगा वतीने येत्या 02 आक्टोबर 2023 रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, लातूर येथे श्रध्देय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेचे नियोजन करण्यासाठी बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीमध्ये सभेसाठी किती लोक,गाड्या,आणि कसे जास्तीत जास्त गर्दी जमवता येईल अशा अनेक महत्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष सुनिल भाऊ सुर्यवंशी,महिला तालुका अध्यक्षा वंदनाताई सुर्यवंशी,उपाध्यक्ष दत्तू गायकवाड, शाम दादा मोरे, महासचिव नितिन सुरवसे,शहर महासचिव रजनिकांत सोनकांबळे,उपाध्यक्ष आकाश दोरवे,संघकक दिनेश शिंदे,जॅकी भाई,महफूस शेख,निरज कांबळे,अविनाश कांबळे,अजय कांबळे,शुभम सुर्यवंशी,रमा कांबळे,व महिला जिल्हा अध्यक्षा मंजूषाताई लिंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थित मध्ये हि बैठक संपन्न झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *