सोलापूर: आदिवासी कोळी समाजाच्या ST जातीचा दाखला व आरक्षण विविध मागण्यांसाठी तसेच झोपेचं सोंग घेतलेला सरकार च्या निषेधार्थ लवकरच कोळी समाजाचा सोलापूर जिल्ह्यामध्ये मोर्चाचे आयोजन करायचे आहे त्यासाठी रविवारी दिनांक 24/9/2023रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे मोर्चा बांधणी करण्यासाठी आढावा बैठक आयोजित केलेली आहे .
त्यासाठी आदिवासी कोळी महादेव समाजाची उपस्थिती महत्त्वाची आहे आता नाही तर कधीच नाही, महाराष्ट्रातील मराठा धनगर ओबीसी न्हावी इत्यादी सर्व समाज मागण्यांसाठी मोर्चे सरकार च्या निषेधार्थ मोर्चा काढत आहेत आपला आदिवासी कोळी समाजाचा तर ST दाखला चा हक्क आसुन आपला समाज गप्प का ? यासाठी गट तट बाजुला ठेवून कोळी समाजाचे नेते मंडळी नी एकत्र येऊन आपल्या समाजा साठी मोर्चा बांधणी करायची आहे तरी कोळी समाज बांधवांनी उपस्थित राह्यचे आहे
मराठा समाज रस्त्यावर उतरला धनगर उतरला लिंगायत तेली माळी साळी ढोर वडर बंजारा वंजारी हे सगळे समाज रस्त्यावर उतरले मग आपण का गप्प सर्व पक्षाचे नेते मंडळी वरील सर्व जातीचे नाव घेतात परंतु कोळी समाजाचे नाव घेतलं जात नाही कोळी समाजाचा महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षाच्या नेते मंडळींना विसर पडलेला आहे झोपेचं सोंग घेतलेल्या सरकार च्या निषेधार्थ मोर्चा बांधणी करायची आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


